चिन्मय मांडलेकरच्या मुलाला त्याच्या नावावरून के...

चिन्मय मांडलेकरच्या मुलाला त्याच्या नावावरून केलं जातंय ट्रोल, अभिनेत्याच्या बायकोने दिले सडेतोड उत्तर(Chinmay Mandlekar’s Son Is Trolled For His Name : Actor’s Wife Replies Back Sharply)

अभिनेता चिन्मय मांडलेकर हा उत्तम अभिनेता तर आहेच पण त्याशिवाय तो उत्तम लेखक, दिग्दर्शकही आहे. त्याने आतापर्यंत अनेक उत्तक मालिका आणि चित्रपटांत काम केले आहे. त्यांचे दिग्दर्शनही केले आहे. चिन्मने सादर केलेल्या कलाकृती प्रेक्षकांना फार आवडतात. त्याचे  ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘शेर शिवराज’ हे सिनेमे खूपच गाजले. आता येत्या 25 जानेवारीला त्याचा गांधी-गोडसे एक युद्ध कथा हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. पण सध्या चिन्मयची त्याच्या चित्रपटामुळे नाही तर त्याच्या मुलामुळे चर्चा होत आहे.

अभिनेता चिन्मय मांडलेकरच्या मुलाचे नाव जहांगीर असे आहे. त्यामुळे त्याच्या नावावर युजर्सनी टिका करायला सुरुवात केली आहे. आपल्या मुलाला विनाकारण टिकेचे धनी व्हावे लागत असलेले पाहून चिन्मयची बायको नेहा मांडलेकरने सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आहे.

नेहाने काही स्क्रिनशॉट शेअर करत त्याखाली भलीमोठी नोट लिहित आपला राग व्यक्त केला आहे. तिने लिहिले की, ‘प्रिय ट्रोलर्स, याचा आता कंटाळा आलाय. अजून किती काळ तुम्ही नऊ वर्षाच्या मुलाला लक्ष्य करणार आहात? प्रत्येकवेळी त्याच्या वडिलांचा नवा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी? जहांगीर रतनजी दादाभाई टाटा हे देशद्रोही नव्हते. या देशासाठी या महापुरुषाने जे काही मिळवलं, त्याचा अनेकांना लाभ झाला. आमच्या मुलाचं नाव आम्ही त्यांच्या नावावरून ठेवलेलं आहे आणि आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे.’

‘पण मी हे सर्व कोणाला सांगतेय? त्यांना हे अगोदरपासून माहीत नाही का? हे लोक द्वेषाने आंधळे झाले आहेत. ते सतत काहीतरी निमित्त शोधत असतात. संस्कार, संस्कृती नेमके काय असतं? अवघ्या ९ वर्षांच्या निष्पाप मुलाचा उल्लेख ‘कार्टं’ म्हणून करणारे संस्कार असतात! त्याच्या आईबद्दल वाट्टेल ते असभ्य बोलणं म्हणजे संस्कृती जपणं का? आम्ही माणुसकी, प्रेम जपणारी माणसं आहोत. माझं संगोपन आणि मूल्य अशा चेहर्‍याविरहित हल्ल्यांचा निषेध करतात, हे सहन करण्यास मनाई करतात.’

चिन्मयच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, गांधी- गोडसे एक युद्ध कथा सिनेमात तो नथुराम गोडसेची भूमिका साकारताना दिसणार आहे. नेमक्या याच कारणामुळे त्याला वेगवेगळ्या प्रकारे ट्रोल केले जात आहे.