घर ठेवा मुलांसाठी सुरक्षित (Children’s Sa...

घर ठेवा मुलांसाठी सुरक्षित (Children’s Safety At Home)

आत्ता, काही महिन्यांपूर्वी जन्मलेलं आपलं तान्हं बाळ बघता बघता कधी उपडी पडू लागतं, रांगू लागतं, घरातल्या प्रत्येक कानाकोपर्‍यात कधी स्वैर संचार करून लागतं कळतच नाही. हातात मिळेल ते खेचणं, शक्य तितक्या वर चढण्याचा किंवा लहानात लहान फटीत शिरण्याचा प्रयत्न करणं, हे प्रत्येक बाळाचं आवडतं काम. त्यामुळे लहान मुलं घरात असली की, खूप सतर्क राहावं लागतं. त्या दृष्टीने या काही टिप्स-

 • नळांना मऊसूत आच्छादन घाला, जेणेकरून नळाच्या टोकेरी कडांमुळे बाळाला इजा होणार नाही.
 • बाथरूममध्ये बाळाला बसण्यासाठी बाथसीट लावल्यास उत्तम.
 • बाथरूमसाठी फरशीची निवड काळजीपूर्वक करायला हवी. बाथरूममध्ये अधिकतर ओल असते, त्यामुळे फरशीवर पाणी असलं, तरी त्यावरून पाय घसरणार नाही, अशा टाइल्सची निवड करा.
 • बाथटबमध्ये केवळ 5 ते 7.5 सेंटिमीटरपर्यंत, म्हणजेच बाळाचे पाय बुडतील इतकंच पाणी भरा.
 • पाणी कोमट असायला हवं.
  आधी थंड पाणी भरून, नंतरच त्यात गरम पाणी घाला.
 • सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, बाथरूममध्ये बाळाला कधीही एकटं
  सोडू नका.
 • बाळाच्या आसपास किंवा बाळासोबत असताना हातात गरम जेवण अथवा पेय कधीच बाळगू नका.
 • बाळाला घेऊन विस्तवाजवळ जाऊ नका.
 • विद्युत उपकरणांचा वापर केल्यानंतर ती तात्काळ बंद केली आहेत, याची खात्री करून घ्या.
 • काडेपेटी, लायटर किंवा इतर टोकेरी वस्तू बाळाच्या हाताला लागणार नाहीत, अशा पद्धतीने ठेवा.
 • अनावश्यक बंपर्स, ब्लँकेट, उशा, स्टफ्ड टॉइज पाळण्यात ठेवून नका. त्यामुळे बाळाचा श्‍वास गुदमरू शकतो.
 • स्वच्छता रोखण्यासाठी जर्म-फ्री टाइल्सचा वापर करा. या टाइल्सच्या देखभालीसाठी खर्चही कमी येतो.
  तसंच त्यामुळे स्वयंपाकघर आणि
  बाथरूम यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी जिवाणूंची निर्मितीही कमी प्रमाणात होते.
  खरंच, बाळाची काळजी घेण्याइतकं महत्त्वाचं दुसरं काहीही नाही. सावध राहणंच शहाणपणाचं आहे. सावध
  राहा आणि आपलं घर आपल्या बाळासाठी सुरक्षित आहे, याची खात्री करून घ्या.