अभिनेत्री स्विनी खरेने प्रियकर उर्विशसोबत केला ...

अभिनेत्री स्विनी खरेने प्रियकर उर्विशसोबत केला साखरपुडा, पाहा फोटो (Cheeni Kum fame Swini Khare Gets Engaged, See Photos)

‘चीनी कम’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या शेजाऱ्यांची भूमिका करणारी 9 वर्षांची स्विनी खरे ही आता मोठी झाली आहे. नुकतेच स्विनीने बॉयफ्रेंड उर्विश देसाईसोबत साखरपुडा केला. अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बालअभिनेत्री स्विनी खरेने नुकताच बॉयफ्रेंड उर्विश देसाईसोबत साखरपुडा केला. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये स्विनी गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केलेली सुंदर बाहुली दिसत होती. तर दुसरीकडे तिचा बॉयफ्रेंड उर्विश ब्लॅक शेरवानीमध्ये पाहायला मिळाला.

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांचे हात धरून, एकमेकांच्या डोळ्यात पाहत, मिठी मारताना आणि हसताना दिसत आहेत.

या सोहळ्यात स्विनी आणि उर्विशने मस्त डान्सही केला.

एका फोटोमध्ये उर्विश गुडघ्यावर बसून स्विनीला अंगठी घालत आहे. तर स्विनी गोड हसून लाजताना पाहायला मिळते. एंगेजमेंटचे अतिशय सुंदर फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शन लिहिले की, “मी तुझ्याशी कागदाच्या अंगठीनेही लग्न करेन. #SwiniGotHerVish.

स्विनीने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी अभिनंदनाची कमेंट केली आहे.

बालिका वधू फेम अविका गौरनेही स्विनीच्या साखरपुड्याच्या फोटोंवर कमेंट करुन, स्विनी सुंदर दिसत असल्याचे सांगितले.