सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनचा पत्नी चारुवर पहि...

सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनचा पत्नी चारुवर पहिले लग्न लपवल्याचा आरोप (Charu Asopa And Rajeev Sen’s Separation: Rajeev Accuses Wife Of Hiding Her First Marriage, Actress Says Rajeev Is Spreading Lies)

सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि त्याची पत्नी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री चारु असोपा यांच्या नात्यात लग्नाच्या सुरुवातीपासूनच काहीही ठिक नव्हते, असे बोलले जात होते.  गेली तीन वर्षे त्यांच्या वैवाहिक जीवनात काही तरी बिनसल्याच्या चर्चा होत होत्या. पण आता हे दोघेही कायद्याने वेगळे होणार असल्याचे नक्की झाले आहे. चारुने राजीवला घटस्फोटाची नोटीस पाठवली असून राजीवनेही चारुवर तिने तिचे पहिले लग्न आपल्यापासून लपवल्याचा आरोप लावत घटस्फोटाची मागणी केली आहे.

एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा करत चारुने म्हटले की, मी आमची मुलगी जियानासाठी राजीवला खूप संधी दिल्या. आमच्या लग्नात गेली तीन वर्षे अनेक समस्या आहेत.  हा कोणताही पब्लिसिटी स्टंट नाही. राजीवला प्रत्येक वेळी मी एक एक संधी देत गेले आणि अशी एक एक संधी करत तीन वर्षे कधी झाली समजलचं नाही.

पण आता मी आणखी सहन करु शकत नाही. राजीवचा माझ्यावर विश्वास नाही. माझ्या विरुद्ध खूप अफवा पसरवल्या गेल्या आहेत. आमच्या नात्यात आता काहीच उरलेले नाही. आमच्या नात्यातील कटुतेचा माझ्या मुलीवर काहीही परिणाम होऊ नये, असे मला वाटते. त्यामुळे मी वेगळे होण्यासाठीची नोटीस पाठवली आहे.  मी माझे करिअरसुद्धा या लग्नासाठी पणाला लावले होते.

राजीवच्या मते, चारुने त्याला तिच्या पहिल्या लग्नाबद्दल कोणतीच माहिती दिली नव्हती. सत्य लपवून त्याला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याला जेव्हा खरे काय आहे ते समजले तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. राजीवने पुढे म्हटले की, तिचा भूतकाळ काहीही असो पण तिने त्याबद्दल मला सांगायला हवे होते. मी तिला पूर्ण सन्मानाने स्विकारले असते. पण तिने मला फसवले. चारुचे पहिले लग्न २०१६ ला तुटले होते पण तिने मला याबद्दल काहीच सांगितले नाही. राजीव आणि चारुचे २०१९ मध्ये लग्न झाले पण आपापसातील वादामुळे ते २०२० पासून वेगळे राहत होते.