मनोज बाजपेयीला चरसी आणि गंजेडी म्हणून फसला केआर...

मनोज बाजपेयीला चरसी आणि गंजेडी म्हणून फसला केआरके, अटक वॉरंट झाले जारी(‘Charsi-Ganjedi’ Tweet: Indore Court Issues Arrest Warrant Against KRK In Defamation Case Filed By Manoj Bajpayee)

कमाल रशीद खान उर्फ ​​केआरके नेहमीच काही ना काही कारणाने वादात अडकतो. नेहमीच बॉलिवूडला टार्गेट करणाऱ्या केआरकेने यावेळीही असेच काही केले की त्याच्याविरुद्ध थेट अटक वॉरंट जारी करण्यात आले.

कमलने अभिनेता मनोज बाजपेयी ड्रग अॅडिक्ट असल्याचे म्हटले होते. कमलने ट्विटरवर ट्विट करून मनोज चरसी आणि गंजेडी म्हटले होते, त्यामुळे त्याच्याविरोधात अभिनेत्याने मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीसाठी कमल न्यायालयात हजर न राहिल्याने इंदौर जिल्हा न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 मे रोजी होणार आहे. याआधीही कमल सुनावणीवेळी हजर न राहिल्याने कोर्टाने त्याच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. दुसरीकडे, मनोजच्या वकिलाचे म्हणणे आहे की, कमलला या प्रकरणाची पूर्ण माहिती आहे, मात्र तो मुद्दाम हजर होत नाही.

केआरकेच्या वकिलाने हे प्रकरण पुढे ढकलण्यात यावे, असे म्हटले आहे कारण त्याच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यामुळे हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. दुसरीकडे, कमलने असेही म्हटले आहे की, तो कॅन्सर पिडित आहे आणि ज्या अकाऊंटवरून मनोज बाजपेयी यांच्या विरोधात हे ट्विट करण्यात आले होते ते अकाऊंट त्याने विकले आहे, हे सर्व ट्विट खूप जुने आहेत आणि अकाऊंटच्या नवीन मालकाने केले आहेत. अशा स्थितीत जिल्हा न्यायालय आपला मुद्दा समजून घेईल, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.