भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियावर ड्रग्सप्रकरणी 2...

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियावर ड्रग्सप्रकरणी 200 पानी आरोपपत्र दाखल (Charge Sheet Of 200 Pages Filed Against Bharti Singh And Harsh Limbachiya In Drugs Case)

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मनोरंजन सृष्टीतील अनेक सुप्रसिद्ध कलाकारांची नावे ड्रग्स सेवन प्रकरणी समोर आली होती. यामध्ये सुप्रसिद्ध विनोदी कलाकार भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या नावाचा देखील समावेश होता. आता समोर आलेल्या माहितीनुसार एनसीबीने या दोघांविरोधात 200 पानी आरोपपत्र दाखल केले असून लवकरच त्यांच्याविरोधात कोर्टात खटला सुरु होईल.

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने भारती आणि हर्षच्या अंधेरी लोखंडवाला येथील घर व कार्यालयावर छापे मारुन 86.5 ग्राम गांजा जप्त केला होता. त्यावेळी दोघांनीही चौकशीदरम्यान गांजाचे सेवन केल्याचे मान्यही केले होते.

त्यानंतर दोघांना 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचल्यावर जामीन  देण्यात आला होता. आता दोन वर्षांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपत्रात भारती व हर्षने एनसीबीला दिलेला जबाब व त्यांच्या घरात सापडलेल्या अमली पदार्थांचा उल्लेख करण्यात आला आहे.

भारती आणि हर्षच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास ते दोघेही सध्या एका रियालिटी शोचे सूत्रसंचालन करत आहेत.