चरित्र अभिनेता विंदू दारासिंग आणि बिग बॉस स्पर्...

चरित्र अभिनेता विंदू दारासिंग आणि बिग बॉस स्पर्धक आसिम रियाज यांनी दिल्या ‘परेल श्री २०२२’ स्पर्धेला शुभेच्छा (Character Actor Vindu Dara Singh And Big Boss Fame Asim Riyaz Promotes Bodybuilding Competition)

चरित्र अभिनेता आणि टेलिव्हिजनवर हनुमानाची भूमिका गाजवलेले विंदू दारासिंग आणि बिग बॉस स्पर्धक अभिनेता आसिम रियाज यांनी उद्या संपन्न होणाऱ्या ‘परेल श्री २०२२’ या शरीरसौष्ठव स्पर्धेस मनापासून शुभेच्छा दिल्या व तरुणांना सदैव फिट राहण्यासंबंधी मौलिक मार्गदर्शन केले.

शरीरसौष्ठव स्पर्धेद्वारे तरुणांना संधी देणारी ‘परले श्री’ ही चौथी स्पर्धा आहे. तिचे संस्थापक व मालक मनीष अडविलकर असून ते स्वतः उत्कृष्ट बिल्डर आहेत. त्यांना या स्पर्धेसाठी दीपक चौहान यांनी भक्कम पाठिंबा दिला आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या सहकार्याने ही भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा मुंबईत होत आहे.

“मी स्वतः बॉडी बिल्डर्सच्या कुटुंबातून आलो आहे. माझे पिताश्री हिंदकेसरी दारासिंग यांची समाजावर इतकी छाप आहे की, कोणी शक्तीप्रदर्शन केले तर तू स्वतःला दारासिंग समजतोस काय, असं बोललं जातं. सर्व सहभागींना माझ्या शुभेच्छा व प्रेम.” असे विंदू यांनी सांगितले. लवकरच परेल मधून निघून भारत श्री, अशी मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा जावो, असा आशावाद त्यांनी प्रकट केला.

“बॉडी बिल्डींगमुळे केवळ शरीरालाच नाही तर मनालाही तंदुरुस्त बनवावे. फिटनेससाठी दररोज स्वतःसाठी १ तास वेळ द्या. फिट फॉर युवरसेल्फ,” असा संदेश आसिम रियाज यांनी दिला.