मुलीच्या करिअरसाठी मंगळसूत्र विकलेल्या आईला चॅन...

मुलीच्या करिअरसाठी मंगळसूत्र विकलेल्या आईला चॅनलने ते परत मिळवून दिले. (Channel’s Gesture To Return The Mangalsutra To A Mother, Who Had Sold It For Her Entry In Dance Reality Show)

टेलिव्हिजनच्या रिऍलिटी शो मध्ये आपली कला प्रदर्शित करण्यासाठी, विजेतेपद मिळविण्यासाठी तरुणांची धडपड चालू असते. त्यांना प्रोत्साहन देणारे, त्यांचे आई-वडील यांचाही त्यात मोठा सहभाग असतो. अशाच एका संघर्षाची कहाणी काल स्टार प्रवाहच्या ‘सुपरस्टार डान्स जल्लोष’ या कार्यक्रमाच्या अंतिम सोहळ्यात अनुभवायला मिळाली. करोनामुळे आर्थिक संकटात सापडलं होतं, या कार्यक्रमाची एक स्पर्धक नेहा मेठे व तिचं कुटुंब. नेहाचे वडील रिक्षा चालवतात. करोना काळात वाहतूक ठप्प झाली व त्यांच्या कुटुंबावर मोठं आर्थिक संकट कोसळलं. त्यातच वडील आजारी पडले. नेहाला स्टार प्रवाहच्या डान्स कार्यक्रमात भाग घ्यायचा होता. या दोन्ही गोष्टींसाठी हातात पैसे नव्हते. तेव्हा आपल्या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभं राहत नेहाच्या आईने आपलं मंगळसूत्र विकलं.

सौभाग्याच्या दागिन्यापेक्षा मुलीच्या करिअरला महत्व देणाऱ्या नेहाच्या आईच्या या निर्णयाबद्दल चॅनलला कळलं तेव्हा त्यांनी नेहाच्या आईला हे मंगळसूत्र द्यायचं ठरवलं. पु. ना. गाडगीळ ऍन्ड सन्स लिमिटेड, या सराफांच्या पुठाकाराने सुपरस्टार जल्लोष डान्स कार्यक्रमात , अभिनेत्री निवेदिता सराफ हिच्या हस्ते, नेहाच्या आईला हे नवं मंगळसूत्र देण्यात आलं,

‘मुलांच्या कलागुणांना वाव देणारे असे पालक आहेत, म्हणून नवे कलाकार घडतात,’ अशी भावना निवेदिताने व्यक्त केली. नेहा न तिची आई या प्रसंगी भावुक झाल्या होत्या.