‘चांदनी बार’, मुळे माझा आत्मविश्वा...

‘चांदनी बार’, मुळे माझा आत्मविश्वास वाढला…. आता विनोदी चित्रपट काढणार – मधुर भांडारकर (‘Chandani Bar’ Gave Me Confidence… Planning A Comedy Film Now’ – Madhur Bhandarkar)

‘चित्रपट निर्मिती’ या विषयावर, पणजी येथील इ फ्फी मध्ये (आंतर्राष्ट्रीयचित्रपट महोत्सव) मास्टर क्लासमध्ये प्रसिध्द दिग्दर्शक मधुर भांडारकर बोलताना म्हणाले की, ‘चांदनी बार’ या चित्रपटामुळे माझा या क्षेत्रात पुढे जाण्याचा आत्मविश्वास वाढला. जरी हा चित्रपट अत्यंत बटबटीत आणि निराशादायी विषयाचा होता, तरी तो शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असेल, असा तयार करण्याचा मी प्रयत्न केला.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
पेज थ्री आणि ट्रॅफिक सिग्नल, अशा पुरस्कार प्राप्त चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या मधुर भांडारकरांनी आपल्या भविष्यातील योजना विषयी बोलताना सांगितले की, ‘करोना महामारीच्या काळात, आपण सगळेच अत्यंत कठीण आणि खडतर परिस्थितीतून गेलो. त्यामुळे आता मी लवकरच विनोदी चित्रपट काढणार आहे.’ आजच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म मुळे नवोदित दिग्दर्शक आणि निर्मात्यांना उत्तम संधी मिळाली, असेही त्यांनी सांगितले.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
चित्रपट समीक्षक तरुण आदर्श यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राष्ट्रीय चित्रपट विजेत्या दिग्दर्शिका नीला महताब पांडा यांच्या हस्ते मधुर भांडारकर आणि तरुण आदर्श यांचा सत्कार करण्यात आला.
-नंदकिशोर धुरंधर