२०२३ च्या सेलिब्रेशनसाठी अभिनेत्रींनी घातले होत...

२०२३ च्या सेलिब्रेशनसाठी अभिनेत्रींनी घातले होते एवढे महागडे ड्रेस…(Celebrities Who Wore Expensive Outfits For New Year-2023 Eve Party)

बॉलिवूडकरांसाठी न्यू इअर सेलिब्रेशन म्हणजे आपल्या आवडत्या ठिकाणी हिंडणे… खाणे-पिणे-नाचणे अन्‌ मनसोक्त शॉपिंग… २०२३च्या स्वागतासाठी बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी त्यांच्या स्टेटसला शोभणारे ड्रेस परिधान केले होते. जाणून घेऊया या अभिनेत्रींच्या सौंदर्याची शोभा वाढविणाऱ्या या ड्रेसेसची किंमत काय होती?

करिना कपूरने नाईट पार्टीसाठी Elie Saab ब्रँडचा लॉरेल ग्रीन सीक्विन गाऊन घातला होता. ज्याची किंमत २,३५,७४८ रुपये होती.

कियाराने दुबई येथे तिच्या बीएफसोबत नवीन वर्ष साजरे केले. त्यासाठी कियारा अडवाणीने Revolve  ब्रँडचा लाइम कलरचा सीक्विन शॉर्ट ड्रेस घातला होता. हा ड्रेस ५१,८९७ किंमतीचा आहे.

आलिया भट्टने लग्नानंतर पहिल्यांदा आपल्या कुटुंबासोबत नवीन वर्षाचे स्वागत केले. तिने त्यासाठीच्या पार्टीमध्ये ग्रे कलरचा सूट घातला होता, ज्यावर हार्ट शेफ होते. आलियाचा Natasha Zinko लेबलवाला को ऑर्ड सेट फक्त ७५,५०० रुपये किंमतीचा आहे.

अनुष्का शर्माने विराट सोबत दुबईला नव वर्ष साजरे केले. तेथे ती ब्लॅक कलरच्या स्टनिंग ड्रेसमध्ये दिसली. Alexander MC Queen ब्रँडचा हा ड्रेस ३,१३,२०२ रुपयांचा होता.

नवीन वर्षाच्या स्पेशल दिवशी रकुल प्रीतने एक स्टायलिश ग्रे कलरचा को ऑर्ड ड्रेस घातला होता. हा ड्रेस  Flirtatious ब्रँडचा असून ३,९०० रुपयांचा होता.