मान्यवरांनी स्वरलतेचा केलेला गुणगौरव आणि त्यांच...

मान्यवरांनी स्वरलतेचा केलेला गुणगौरव आणि त्यांचे दुर्मिळ फोटो (Celebrities Highest Order Appreciation For Lata Didi And Her Rare Photographs)

पं. भीमसेन जोशी लतादीदीबद्दल म्हणाले होते : ‘अवतार समाप्तीनंतर परमेश्वराने पृथ्वीतलावर विसरून गेलेली बासरी म्हणजे लता मंगेशकर.’

तरुण हृदयनाथ सोबत लतादीदी

आई-बाबा आणि इतर भावंडांसह छोटी लता.

आचार्य अत्रे यांनी स्वरसम्राज्ञीचे गुणगान करताना म्हटले होते –

‘श्रीकृष्णाच्या मुरलीची साद, उर्वशीच्या नुपुरांची रुणझुण आणि सरस्वतीच्या वीणेचा झंकार हे तिन्ही एकवटून विधात्याने आपल्या लताचा कंठ घडवला असेल… सूर, लय, ताल, सिद्धी आणि प्रसिद्धी या गोष्टी जिथे एकत्र येतात, त्या जागेला आपण लता मंगेशकर असं म्हणावं…’

लताजींचे ‘ये जिंदगी उसी की है’ हे गाणे ऐकून उस्ताद बडे गुलाम अली खान म्हणाले होते, ‘कम्बख्त, ये लडकी कभी बेसुरी नही होती.’

स्वरलता आणि स्वराशा

लतादीदी, भावंडांसमवेत. सोबत आई – माई मंगेशकर

‘वीर झारा’ या चित्रपटासाठी लतादीदींनी एक पैसाही मानधन घेतले नाही. कारण या गाण्यांच्या मूळ चाली संगीतकार मदन मोहन यांच्या होत्या. मदनजींच्या मुलाने संजीव कोहलीने त्यावर आधुनिक स्वरसाज चढविला आणि लतादीदींने त्या गाण्यांचे आपल्या गोड गळ्याने सोने केले.

लतादीदींनी आपल्या मदनभैय्याच्या प्रेमाखातर, त्यांच्या पश्चात दाखविलेली ही कृतज्ञता पाहून ‘वीर झारा’चे निर्माते – दिग्दर्शक यश चोप्रा यांनी त्यांना मर्सिडीज मोटार भेट दिली.

लतादीदी संगीतकार मदन मोहन यांना भाऊ मानत

चिरतरुण, चतुरस्र संगीतकार एस. डी. बर्मन यांच्या समवेत लता

तत्कालिन पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी यांच्यासोबत लता

स्वरलता की सुंदर लता?

स्वातंत्र्यवीर सावरकरांची परमभक्त लतादीदी