करिअर इन सोशल सायन्स (Career In Social Science)

करिअर इन सोशल सायन्स (Career In Social Science)

विविध विषयांचा अभ्यास करण्याची आवड, विविध समस्यांवर काम करण्याची इच्छा आणि सतत लोकांच्या गराड्यात राहण्याची आवड असणार्‍यांनी या वेगळ्या क्षेत्राचा विचार नक्की करावा.

सामाजिक कामाची आवड असल्यास सोशल सायन्स हा करिअरसाठी चांगला मार्ग होऊ शकतो. सामाजिक काम म्हणजे समाजसेवा करून काय मिळणार, असा बरेच जणांचा गैरसमज असतो. परंतु यामध्येही आपण आपल्या आवडीचं क्षेत्र निवडून आपला वेळ देऊ शकतो आणि चांगले अर्थाजर्नही करू शकतो. अर्थात त्यासाठी निश्‍चितच थोड्या संयमाची आवश्यकता आहे आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे आवड पाहिजे. यामध्ये करिअर करु इच्छिणार्‍यांसाठी अँथ्रोपोलोजिस्ट, अर्थशास्त्रज्ञ, सामाजिक मानसशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ता, सर्व्हे रिसर्चर आदी अनेक संधी उपलब्ध आहेत.
अँथ्रोपोलोजिस्ट

अँथ्रोपोलोजिस्ट होऊन मानवी वर्तणुकीचा अभ्यास करता येतो. सामाजिक प्रश्‍न सोडविण्यासाठी अँथ्रोपोलोजिस्टची भूमिका महत्त्वाची असते.
अर्थशास्त्रज्ञ

अर्थशास्त्राशी संबंधित माहिती संकलित करून नवीन धोरण आखण्यासाठी मदत होऊ शकते. या क्षेत्रात येण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची अर्थशास्त्र विषयातील पदवी आवश्यक आहे. त्याचबरोबर मिळालेल्या माहितीचे अचूक विश्‍लेषण करता आले पाहिजे. व्यवसाय सल्लागार, आर्थिक सल्लागार म्हणून यामध्ये नोकरी आणि स्वतंत्र व्यवसायही करता येऊ शकतो.
सामाजिक मानसशास्त्रज्ञ

सामाजिक स्थितीची जाणीव ठेवण्यासाठी महत्त्वाचा घटक मानला जातो. समुपदेशक म्हणूनही यामध्ये चांगली संधी आहे.
सामाजिक कार्यकर्ता

सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करताना आपला आनंद शोधता येतो. दुसर्‍यांसाठी काम करताना मिळणारा आनंद अनुभवता येतो. यामध्येही रोजगाराच्या संधी आहेत. दिवसेंदिवस एकाकीपणात वाढ होत आहे. ज्येष्ठ नागरिकांची सेवा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची गरज समाजाला भासत आहे. आपला वेळही सत्कारणी लावता येईल आणि आर्थिक लाभही घेता येईल.
नोकरीच्या संधी
शासनाच्या विकासाच्या प्रकल्पाबरोबर सामाजिक संस्थांतून नोकरीच्या संधी उपलब्ध. स्वतःची सामाजिक संस्था स्थापन करण्याची संधी.
पात्रता
–  मान्यताप्राप्त महाविद्यालयातून याविषयीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
–  बारावी, पदवीनंतर प्रवेश.
–  कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर एमबीए किंवा सोशल सायन्सच्या पुढील शिक्षणाची संधी
–  परदेशी विद्यापीठांतूनही अभ्यासक्रम उपलब्ध.


हवाई सुंदरी व्हायचंय? (Young Beautiful Girls Can Make Career As Air Hostess)