घ्या डोळ्यांची काळजी (Take care of eyes)

घ्या डोळ्यांची काळजी (Take care of eyes)

घरच्या घरी उपलब्ध असलेल्या उपायांनी आपल्या डोळ्यांची काळजी घ्या.

–    त्रिफळा चूर्ण रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून सकाळी ते पाणी गाळून घ्या आणि त्या पाण्याने डोळे स्वच्छ धुवा. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढते.

–    कोथिंबीर वाटून त्याचा रस 2-2 थेंब रोज डोळ्यांत घातल्याने फायदा होतो.

–    अंधूक दिसत असेल तर संत्र्याच्या रसामध्ये काळी मिरपूड व सैंधव मीठ घालून सकाळ-संध्याकाळ प्या. असे तीन महिने केल्यास नक्कीच फरक जाणवेल.

–    वेलची पूड आणि साखर सारख्याच प्रमाणात घेऊन त्यामधे एरंडेल तेल मिसळावे आणि रोज 4 ग्रॅम इतके सकाळी घ्यावे. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो आणि नजर चांगली होते.

–    1 कप गाजराचा रस आणि पाऊण कप पालक किंवा चवळीचा रस एकत्रितपणे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस घेतल्यास डोळ्यांची नजर वाढते.

–    8 ते 10 बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवून सकाळी खा. त्यावर लगेच गाईचे दूध प्या. यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढते.

–    आठवड्यातून तीन वेळा रात्री झोपताना कापसाची पट्टी दुधात बुडवून ती डोळ्यांवर ठेवून त्यावर पट्टी बांधा. तसेच कधी कधी डोळ्यांत दुधाचे (थंड व स्वच्छ दूध गरम केल्यानंतर) दोन-तीन थेंब टाकल्यास डोळ्यांना थंड वाटते शिवाय डोळ्यांची दृष्टी कधीही कमजोर होत नाही.

–    रोज जेवणासोबत केळं, सफरचंद, हिरव्या भाज्यांचं सूप, पालक, मेथी, कोबी, गाजर आणि टोमॅटो खावे. यामुळे डोळे कायम चांगले राहतात.

–    याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरेशी झोप घ्या आणि तणावमुक्त राहा.