कान्स फेस्टीवलमध्ये कपडे, मेकअप आणि वाढलेल्या व...

कान्स फेस्टीवलमध्ये कपडे, मेकअप आणि वाढलेल्या वजनामुळे टिकेची धनी ठरली ऐश्वर्या राय बच्चन (Cannes 2022: Aishwarya Rai Bachchan Gets Brutally Trolled And Fat Shamed For Her Looks)

जगात प्रतिष्ठेचा मानला जाणारा कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू झाला आहे. त्यामध्ये आपल्या अभिनेत्री हिना खान, दीपिका पादुकोण, पूजा हेगडे यांची उपस्थिती लक्षणीय होती. पण लोक वाट पाहत होते ऐश्वर्या राय बच्चनची. मात्र पहिल्यांदाच तिचे लूक पाहून लोकांची निराशा झाली.

ऐश्वर्याने पहिल्याच दिवशी पिंक सूट घातला. त्यावर तिची निंदा झाली. कपड्यांबरोबरच मेकअप आणि हेअरस्टाईल खराब आहे, असं लोक म्हणाले. एकतर तू स्टायलिस्ट बदल किंवा मेकअप. कारण तुझं वय वाढल्याचं दिसत आहे, असंही लोक बोलले.

त्यानंतर लोक वाट पाहत होते तिच्या रेड कार्पेटवर येण्याची. यासाठी तिने ब्लॅक फ्लॉवर गाऊन घातला. तोही लोकांना काही आवडला नाही.

या पाठोपाठ ऐशचं तिसरं लूक देखील लोकांना अजिबात रुचलं नाही. तिचं वाढलेलं वजन पाहून पण लोक टिका करत आहेत. काहींना वाटतंय्‌ की तिने लिप जॉब केला आहे, तर काहींना असंही वाटतंय्‌ की तिला पुन्हा दिवस गेलेत…

चाहते तिला असाही प्रश्न करताहेत की, बाई गं, तुझ्या स्वतःच्या चॉईसचं काय झालं? बॉलिवूड कलावतींपेक्षा हिना खान जास्त चांगले लूक्स देते आहे.