भारताला पाठिंबा देण्यासाठी नायगरा धबधब्याला तिर...

भारताला पाठिंबा देण्यासाठी नायगरा धबधब्याला तिरंगी साज (Canada’s Gesture ; Niagara Falls Lit Up Tricolor)

जगातील सर्वात मोठा धबधबा – नायगरा फॉल्सचा एक भाग कॅनडात आहे. राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक दाखवत कॅनडाने या अव्याहत वाहणाऱ्या धबधब्यात भारताच्या राष्ट्रध्वजाचे तीन रंग त्यात सोडले. अर्थात्‌ रात्रीच्या वेळी केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगाचे प्रकाशझोत सोडून नायगरा धबधबा तिरंगा बनविला. हे विहंगम दृश्य अर्धा तास दाखविण्यात आले. ते पाहून हजारो पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

आपल्या देशात कोविड – १९ च्या संसर्गाने उसळी घेतली आहे. त्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे, हे दर्शविण्यासाठी व त्यातून भारत सुखरुप बाहेर पडेल, असा आशावाद व्यक्त करण्यासाठी कॅनडा सरकारने हे प्रदर्शन केले.

याआधी दुबईमधील बुर्ज खलिफा, या जगातील सर्वात उंच असलेल्या, पर्यटकांचे जबरदस्त आकर्षण असलेल्या, इमारतीवर असेच तिरंगी प्रकाशझोत सोडून सौदीच्या राजांनी भारत लढत असलेल्या कोविड विरोधी युद्धास पाठिंबा दाखवला होता. पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यांनी अनेक प्रगत देशांशी जे सौहार्दाचे संबंध प्रस्थापित केले आहेत, त्याचे हे फळ असल्याचे राजकीय निरिक्षकांचे मत आहे.