हेअर कलरने केस खराब होतात का? (Can Hair Colour ...

हेअर कलरने केस खराब होतात का? (Can Hair Colour Damage Your Hairs?)

नेहमी हेअर कलर केल्याने केस खराब होतात का ?
असे काही नसते. तुम्ही कोणत्या दर्जाचे प्रॉडक्ट वापरता त्यावर ते अवलंबून असते. त्याचबरोबर केसांचा पोत कसा आहे ते पाहणेही महत्वाचे असते.

चेहर्‍यावर वांग असेल तर काय करावे ?
चेहर्‍यावर वांग असेल तर आधी साबण वापरणे बंद करावे. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. यु व्ही असणारे फेस क्रीम वापरावे. किंवा टोमॅटोच्या रसने मसाज करावा नि 15 मिनिटाने चेहरा धुवावा.

चेहर्‍यावर येणारे अनावश्यक केस असतील तर ते झाकण्यासाठी ब्लिच करणे योग्य आहे का ?
चेहर्‍यावरील अनावश्यक केसांसाठी ब्लिच केले तरी चालेल, परंतु महिन्यातून 1 वेळा करणे योग्य आहे. नेहमी करू नये. कारण ब्लिच काही काळापुरतेच टिकते.

केसात कोंडा होण्याची काय कारणं असतील? तो कसा घालवावा?
त्वचेत कोरडेपणा आला की कोंडा होतो. तेव्हा आठवड्यातुन 2 वेळा हेडमसाज करावा. त्यामुळे कोंडा होत नाही, कोंडा जास्त प्रमाणात होत असेल तर 10 मिनिटं केसांना ताक लावून ठेवावे नंतर केस स्वछ धुवावे

चेहर्‍यावर सुरकुत्या असतील तर काय करावे?
चेहर्‍यावरील सुरकुत्या घालवायच्या असल्यास चेहर्‍यावर कच्च्या बटाट्याने 20 मिनिट मसाज करावा, त्यानंतर 10 मिनिटांनी चेहरा धुवावा. असे आठवड्यातून 3 वेळा करावे.

मेकअप करण्याआधी प्राइमर लावावं का?
हो लावावे. त्यामुळे स्किनवर कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाहीत. प्रायमरमुळे काही वेळापूरते स्किनवरचे रिंकल्सही झाकले जातात.

नेहमी मेकअप केल्यावर स्किन खराब होते का ?
मेकअप करताना योग्य ती काळजी घेतली की स्किन खराब होत नाही. मेकअप प्रॉडक्ट ब्रॅण्डेड असणे आवश्यक आहे तसेच मेकअप पुसूनच झोपावे. ते खूप गरजेचे आहे. त्यानंतर नाईट क्रिम लावावे.