सुवर्ण खरेदी ही उत्तम गुंतवणूक (Buying Gold Orn...

सुवर्ण खरेदी ही उत्तम गुंतवणूक (Buying Gold Ornaments On The Auspicious Occasion Can Be A Good Investment For Future)

साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या या अक्षय तृतीयेला नवा उद्योग सुरू करणे, नव्या कार्याचा शुभारंभ करणे, घर विकत घेणे अथवा त्याचे बुकिंग करणे; अन मुख्य म्हणजे सोने खरेदी करणे, या प्रथा पाळल्या जातात. सुवर्ण खरेदीसाठी हा दिवस म्हणजे उत्तम दिवस, असे मानले जाते. या निमित्ताने दासानी ब्रदर्स या सराफ पेढीचे भागीदार, सुमित दासानी यांनी सोने आणि हिर्‍यांचे दागिने विकत घेण्यासंबंधी नवे विचार मांडले आहेत.
ते म्हणतात की, एखादे घर घेणे ही ज्याप्रमाणे गुंतवणूक आहे, त्याप्रमाणेच सोने अथवा हिर्‍याचे दागिने या मुहूर्तावर घेणे ही चांगली गुंतवणूक होऊ शकते. जी भविष्य काळात फलदायी ठरू शकते. दागिन्यांची हौस पुरवत  चांगली गुंतवणूक होऊ शकते.

त्यांनी असाही एक विचार मांडला आहे की, या दिवशी किंवा वाढदिवस अथवा लग्नप्रसंगी आपल्या प्रियजनांस काय भेटवस्तू द्यावी, याचा संभ्रम असतो. आपण दिलेली भेट घेणाऱ्याला आवडेल की नाही, ते कळत नसते. अशा वेळी नाजूक दागिन्यांची भेट हा चांगला पर्याय आहे. दागिने हे जन्मभर त्या व्यक्तीजवळ राहतात व त्याला आपली आठवण राहते. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने दासानी ब्रदर्सने पेस्टल ज्वेलरीचे, अर्थात असे नाजूक दागिने पेश केले आहेत. 18 कॅरेट सोन्यामध्ये मढवलेल्या या दागिन्यांमध्ये हिरे, मोती, पाचू, माणिक जडवले आहेत.