फटाके फोडणे म्हणजे घोर अज्ञानच नव्हे तर निष्काळ...

फटाके फोडणे म्हणजे घोर अज्ञानच नव्हे तर निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा अन् कालबाह्य प्रथा… असं बोलली रिया कपूर! (Bursting Crackers Is Not Only Dated But Grossly Ignorant, Says Rhea Kapoor As She Shares Anti Cracker Post & Urges Everyone Not To Burst Crackers During Diwali)

अनिल कपूरची मुलगी रिया कपूर नेहमी इतर लोकांपेक्षा वेगळे मत मांडते आणि त्यासाठी ट्रोलही होते. आधी तिने तिच्या लग्नात पारंपरिक पोशाख सोडून पांढरा रंग स्वीकारला, नंतर काय तर, करवा चौथच्या प्रथेवर तिचा विश्वास नसल्याचे तिने सांगितले आणि आता सुद्धा रियाने जी गोष्ट सांगितली आहे ती सुद्धा कदाचित लोकांना आवडणार नाहीये.

रियाने लोकांना दिवाळीत फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे. फटाके फोडणे हे केवळ घोर अज्ञानच नाही तर निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा आणि कालबाह्यपणाचे आहे, असे तिने म्हटले आहे. रियाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक कोट शेअर केला आहे की, तुम्ही जे काही करता ते पाहणे किंवा ऐकले जाणे आवश्यक नाही!

तसं पाहिलं तर रिया ही पहिलीच सेलिब्रिटी नाही जिने लोकांना दिवाळीला फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे, याआधीही अनेक सेलिब्रिटींनी असे सांगितले आहे आणि त्यांना देखील ट्रोल केले गेले आहे. कारण लोकांचे म्हणणे आहे की, जगाला ज्ञान देणारी ही मंडळी कधी ना कधी इतर धर्माचे सण साजरे करतात. पण हिंदूंचा सण आला, म्हणजे होळी असो वा दिवाळी, प्रत्येकजण ते कसे सुरक्षित नाही, ते योग्य नाही असं सांगून आपलं ज्ञान पाजळू लागतो.

लोकही म्हणतात, संदेश चांगला आहे पण त्यात भेदभाव का? हिंदू सहन करतो म्हणून हे लोक त्याला मुद्दाम टार्गेट करतात.

गेल्या वर्षी विराट कोहलीनेही अशाच आवाहनाचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यावर त्याला मोठ्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. हल्लीच आमिर खानला देखील सिएट टायरच्या जाहिरातीमधून अशाप्रकारचे आवाहन केले म्हणून बरंच काही ऐकावं लागलं होतं.

आता रिया कपूरने दिवाळीसाठी केलेल्या या पोस्टवर लोक कशी आणि काय प्रतिक्रिया देतात ते पाहुया.

फोटो सौजन्य – सर्व फोटो इ्स्टाग्राम