सीमा सुरक्षा दलाच्या महिलांचे शौर्य : मोटारसायक...

सीमा सुरक्षा दलाच्या महिलांचे शौर्य : मोटारसायकल वरून ५२८० किलो मीटर्स प्रवास करण्याची मोहीम (BSF Women’s Daredevil Expedition To Travel 5280 Kms On Bike)

सीमा सुरक्षा दलाच्या धाडसी महिलांनी मोटारसायकलीवरून  ५२८० किलो मीटर्स प्रवास करण्याची शौर्यशाली मोहीम हाती घेतली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून या महिलांनी सीमा भवानी शौर्य मोहीम सुरु केली. या मोहिमेत त्या रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० या बाईक्स वर प्रवासाला निघाल्या आहेत.

नवी दिल्लीच्या इंडियागेट येथून ही मोहीम ८ मार्चला सुरु झाली व त्याच दिवशी ४५० कि. मि. अंतर कापून या धाडसी महिलांची तुकडी, सायंकाळी वाघा बॉर्डर (भारत -पाकिस्तान सीमारेषा) येथे पोहचली होती.

आज ही तुकडी अमृतसर येथून रवाना झाली असून जयपूरला १२ तारखेस पोहचेल व तेथून उदयपूर, गांधीनगर, भरूच, नाशिक, पुणे, सोलापूर, हैदराबाद, अनंतपूर, बेंगळुरू, मदुराई कन्याकुमारी अशा शहरांमधून प्रवास करत चेन्नई येथे २८ मार्चला पोहचणार आहे. असा त्यांचा ५२८० किलोमीटर्सचा विक्रमी प्रवास ठरणार आहे.

देशहितासाठी महत्वाची कार्ये पार पडण्यास, तरुण महिलांना प्रोत्साहन देणे व भारतीय महिलांची सक्षमता, नाही शक्तीचे प्रदर्शन करणे, ही या सीमा भवानी मोहिमेची उद्दिष्टे असून तिला रॉयल एनफिल्ड या सर्वात जुन्या बाईकने समर्थन दिले आहे.