नववधूंची लेहेंग्यापेक्षा पारंपरिक साड्यांना अधि...

नववधूंची लेहेंग्यापेक्षा पारंपरिक साड्यांना अधिक पसंती (Brides Prefer To Wear Traditional Sarees More Than Lehenga)

छायाचित्रे : ‘क्रीव्हा’ ऑनलाईन पोर्टलच्या सौजन्याने

कोणत्याही स्त्रीसाठी तिच्या विवाहासारख्या महत्त्वाच्या दिवसाचे नियोजन करताना नववधूचा पोषाख ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. ही गोष्ट म्हणजे केवळ नववधूच्या सांस्कृतिक आणि पारंपरिक मूळांचे प्रतिबिंब नसते तर तिच्या व्यक्तिमत्वाचे पैलूही त्यातून प्रकट होत असतात. देश, धर्म आणि समाजाप्रमाणे परंपरा बदलतात, पण विवाहप्रसंगी असलेले नववधूच्या पोषाखाचे महत्त्व अबाधितच आहे.

भारतात, बहुतांश नववधू ह्या ज्या प्रदेशातून आणि संस्कृतीतून आलेल्या आहेत, त्यावरून त्या या विशेष दिवशी लेहेंगा किंवा साडी हा पारंपरिक पोषाख घालणे पसंत करतात. भारतातील बहुतांश भागातील नववधू लेहेंगा परिधान करतात तर पूर्व आणि दक्षिण भागातील नववधूंसाठी साडी हा नेहमीच पसंतीचा पारंपरिक पोषाख असतो.

लेहेंग्यांमध्ये असलेल्या विविधांगी डिझाईन्समुळे गेल्या दोन वर्षांत भारतभरातील नववधूंमध्ये लेहेंग्यांची लोकप्रियता वाढताना दिसली. असे असले तरी, या वर्षी असे दिसून येत आहे की भारतीय नववधूंसाठी साडीचा पर्याय अधिक ठळकपणे समोर येत आहे. यावर्षी सुरुवातीला बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमने तिच्या विवाहप्रसंगी नाजूक कलाकुसर आणि आकर्षक चंदेरी एम्ब्रॉयडरी असलेली लाल रंगाची उत्कृष्ट, पारंपरिक साडी नेसली होती. त्याचप्रमाणे, दिया मिर्झा, दीपिका पादुकोण आणि विद्या बालन या इतर लोकप्रिय अभिनेत्रींनीही त्यांच्या विवाहप्रसंगी सुंदर, आकर्षक साड्यांच्या माध्यमातून त्यांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपला होता.

नववधूंच्या या पोषाखांसाठीची विवाहाची खरेदी ऑनलाईन होताना दिसत आहे. बहुतांश ग्राहक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले पर्याय आणि घरातल्या आरामशीर वातावरणात बसून खरेदी करण्याची सोय यामुळे ऑनलाईन साडी खरेदीला प्राधान्य देतात. सध्याच्या परिस्थितीत ग्राहकांना ऑनलाईन खरेदी हा सर्वाधिक सुरक्षित पर्याय वाटत आहे.

मिशो या भारतातील वेगाने वाढणाऱ्या इ-कॉमर्स अॅपने लग्नसराईची तयारी करताना गेल्या दोन महिन्यात ४ कोटीहून अधिक मोठी ऑर्डर मिळवत त्यांच्या साडी विक्रीत झालेली वाढ नोंदवली आहे. विशेष जाणवलेली गोष्ट म्हणजे जुलै २०२० पासून साड्यांच्या ऑर्डरमध्ये वाढ सुरु झाली आणि साधारण ऑक्टोबर २०२०च्या आसपास साडी विक्रीत ठळक वाढ दिसून आली. वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीतही सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आणि सप्टेंबर-ऑक्टोबरपासून लग्नसराईचा मोसम सुरु होत असताना पारंपरिक साड्यांच्या विक्रीत जाणवण्याइतकी वाढ दिसून आली. यात कॉटन सिल्क, जॉर्जेट, बनारसी सिल्क, कॉटन विथ प्रिंट, विणलेल्या झारी, ॲम्ब्रॉयडरी आणि कलाकुसरीच्या साड्यांचा समावेश होता. गुलाबी, लाल रंगांपासून काळ्या रंगाच्या साड्यांना देखील पसंती होती.

साध्यासुध्या पारंपरिक लग्नातील पोषाखापासून अभिजात आणि समकालीन फॅशनचा संगम साधेपर्यंत साडी उत्क्रांत झाली आहे. पारंपरिक बनारसी, पैठणी आणि कांजीवरमच्या पलीकडे जाऊन विविधांगी डिझाईन्स साड्यांमध्ये उपलब्ध आहेत.

त्यामुळे डिझायनर दालनामधून घेतलेल्या सर्वात महाग नववधू पोषाखाची हवा होण्याचे दिवस आता गेले आहेत. आजची नववधू ही आधुनिकतेच्या वळणाने जाणारी पारंपरिक आहे आणि तिच्या आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या प्रसंगाचा साडी हा महत्वाचा घटक आहे!