कृष्णा मुखर्जीच्या लग्नाआधीच्या समारंभाचे फोटो ...

कृष्णा मुखर्जीच्या लग्नाआधीच्या समारंभाचे फोटो व्हायरल, ढोलकीच्या तालावर ठेका धरताना दिसली अभिनेत्री (Bride-To-Be, Krishna Mukherjee Dons A White Lehenga, Dances On ‘Dhol’ At Her ‘Haldi’ Ceremony)

टीव्ही अभिनेत्री कृष्णा मुखर्जीचे लग्नाआधीचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. मेहंदी सोहळ्यानंतर आता हळदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्री आपल्या हळदी समारंभात पांढऱ्या लेहेंगा घातला होता. अभिनेत्रीचा भावी वर चिराग बाटलीवालाने देखील कृष्णाला साजेसा असा पोशाख घातला होता.

कृष्णा मुखर्जी टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘ये है मोहब्बतें’ या टीव्ही मालिकेतून तिला घरोघरी ओळख मिळाली आणि आता कृष्णा मुखर्जी आपल्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करत आहे. कृष्णा मुखर्जी आपला स्वप्नातला राजकुमार चिराग बाटलीवालासोबत विवाहबद्ध होणार आहे. आज गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग स्वरुपात ती चिराग बाटलीवालासोबत लग्नगाठ बांधणार आहे.

गोव्यात कृष्णा मुखर्जी यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. त्या आधी 11 मार्च 2023 रोजी मेहेंदीचा कार्यक्रम झाला होता.

काल त्यांचा हळदीचा कार्यक्रम होता. अभिनेत्रीच्या हळदी समारंभाची सुंदर झलक आता पाहायला मिळाली आहे.

स्टायलिस्ट आणि वधू-वरची जवळची मैत्रीण सुगंधा सूदने, इन्स्टा स्टोरीजमध्ये हळदी समारंभाचे फोटो शेअर केले.

फोटोंमध्ये होणारी वधू या सोहळ्याचा आनंद घेताना दिसत आहे. एका फोटोत कृष्णा फुलांची छत्री फिरताना खूप आनंदी दिसत होता.

हळदी समारंभाच्या या फोटोंमध्ये कृष्णा पारंपारिक रंगाऐवजी पांढरा लेहेंगा आणि फुल स्लीव्ह ब्लाउजमध्ये दिसत आहे. सोबत मिरर वर्क असलेला पिवळ्या रंगाचा दुपट्टा आहे. फ्लॉवर ज्वेलरी आणि मेकअपसह तिने आपला लूक पूर्ण केला आहे.

याआधी, अनिता हसनंदानीने आपल्या इन्स्टाग्रामवर कृष्णा मुखर्जीच्या मेहंदी सोहळ्यातील एक सुंदर व्हिडिओ शेअर केला होता.