‘ब्रेकिंग न्यूज, मलायका अरोरा आणि अर्जुन ...

‘ब्रेकिंग न्यूज, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पॅरिस येथे करणार साखरपुडा’ – ट्रेड एक्सपर्ट उमैर संधू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली खबर (Breaking news: Malaika Arora & ArjunKapoor will get engaged next week in Paris !!! – Umair Sandhu)

ट्रेड एक्सपर्ट उमैर संधू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मलायका आणि अर्जुन कपूर साखरपुडा करणार असल्याचे सांगितले आहे.

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या लग्नसराई सुरु आहे. एकामोगामाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत असल्याचे आपण पाहत आहोत. अशातच बॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय जोडी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या लग्नाबाबतही चाहत्यांना अनेक प्रश्न आहेत. मलायका आणि अर्जुन यांनी कधीही आपलं नातं लपवून ठेवलं नाही. मात्र आता पुढे काय असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.

आता त्या दोघांनी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेड एक्सपर्ट उमैर संधू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मलायका आणि अर्जुनचा साखरपुडा होणार असल्याचे सांगितले आहे. ‘ब्रेकिंग न्यूज, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पुढच्या आठवड्यात पॅरिस येथे साखरपुडा करणार आहेत’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे. पॅरिसमधील त्यांच्या साखरपुड्याला काही मोजक्याच लोकांना बोलावण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. मार्च महिन्यात ते लग्नाचे प्लानिंग करत आहेत.

बॉलिवूड मधील लव्ह बर्डस अर्थात अर्जुन कपूर आणि मलायका अरोराला बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहेत. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी त्यांचं नातं काही दिवस जगापासून लपवून ठेवलं होतं मात्र काही काळानंतर त्यांनी हे मान्य केलं. त्यानंतर दोघांच्या कुटुंबानेही त्यांच नातं स्वीकारलं असल्याचं सांगितल गेलं.

एकीकडे मलायका अर्जुनशी साखरपुडा करणार आहे तर दुसरीकडे मलायका आणि अरबाजचा मुलगा अरहानला भेटताना दिसते. मुलांसाठी ते सतत भेटताना दिसतात. अरबाज आणि मलायकाचे १९९८ साली लग्न झाले होते. मात्र सतत होणाऱ्या भांडणामुळे त्यांनी २०१७ साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता मलायका आता अर्जुनशी लग्न करणार असल्याचे समोर आले आहे.

अर्जुन-मलायकाच्या अफेअरनंतर चाहते त्यांच्या लग्नाची बातमी ऐकण्यासाठी उत्सूक होते. हे दोघे लग्नासाठी तयार आहेत अशा बऱ्याच बातम्या आल्या मात्र त्या अफवा होत्या. पुन्हा एकदा अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या लग्नाची बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे आणि पुढच्या आठवड्यात हे दोघे साखरपुडा करू शकतात, असे समजते.