रणबीर कपूर आणि आलियाला उज्जैनच्या महाकाल मंदिरा...

रणबीर कपूर आणि आलियाला उज्जैनच्या महाकाल मंदिरात प्रवेश नाकारला, गोमांसवाल्या विधानावर हिंदू संघटनांनी केला विरोध (Brahmastra Promotions: Ranbir Kapoor And Alia Bhatt Stopped From Entering Ujjain’s Mahakaleshwar Temple By Hindu Activists Over His Old Beef Comment)

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. त्यामुळे दोघेही या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. सध्या ज्या प्रकारे बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्काराचा ट्रेंड चालू आहे त्यामुळे दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि निर्माता करण जोहर फार चिंतेत आहेत. बहिष्काराच्या मागणीचा मोठमोठ्या चित्रपटांवर परिणाम होत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे लालसिंग चड्ढा चित्रपट.अशातच आता बॉयकॉट ब्रह्मास्त्र हा ट्रेंड सोशल मीडियावर जोर धरु लागला आहे. 

आलिया, रणबीर आणि अयान मुखर्जी केवळ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उज्जैन शहरात गेले. तिथे गेल्यानंतर त्यांना चित्रपटाच्या यशासाठी महाकाल देवाचा आशीर्वाद घ्यायचा होता, परंतु आलिया आणि रणबीरला मंदिरात प्रवेश दिला नाही त्यामुळे अयान मुखर्जी एकटेच दर्शनासाठी मंदिरात गेले.

उजैनमध्ये महाकाल मंदिरात हिंदू संघटनांनी व्हीव्हीआयपी गेटबाहेर जोरदार निदर्शने केली, त्यांना काळे झेंडेही दाखवले. या संघटनांनी म्हटले की, रणबीरनेच गोमांस खाण्याची बाब मान्य केली आहे, मग अशा गोमांस खाणाऱ्याला मंदिरात प्रवेश कसा द्यायचा?

 रणबीरचा एक अकरा वर्षांपूर्वीचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो गोमांस खाण्याबाबत बोलताना दिसत आहे, त्यामुळे तो बजरंग दल आणि इतर संघटनांच्या निशाण्यावर आला आहे. रणबीरला हिंदूविरोधी मानले जात आहे.

मंदिराबाहेर गोंधळ झाल्यानंतर दाम्पत्याला दर्शन न घेताच परतावे लागले. यादरम्यान आलिया, रणबीर आणि आर्यन या तिघांनाही उज्जैन कलेक्टरच्या घरी नेण्यात आले. पुढे पोलिसांनी दंगलखोरांचा सौम्य भाषेत समाचार घेतला परंतु रणबीर-आलियाला मंदिरात प्रवेश दिला नाही.

त्याचवेळी, अयानने गाभाऱ्यात जाऊन महाकालची पूजा-अर्चा केली. त्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला त्याला 3 दिवस बाकी आहेत… आज महाकाल मंदिरात गेल्यानंतर मला खूप आनंद आणि उत्साही वाटत आहे…सुंदर दर्शन… ब्रह्मास्त्रचा चित्रपट बनवण्याचा प्रवास पूर्ण करण्यासाठी आणि चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी मला येथे यायचे होते, असे कॅप्शन दिले.