ब्रह्मास्त्र प्रदर्शनाबाबत विचारलेल्या प्रश्नां...

ब्रह्मास्त्र प्रदर्शनाबाबत विचारलेल्या प्रश्नांमुळे आलिया पत्रकारांवर भडकली (Boycott Trend: Alia Bhatt Gets Angry At The Journalist On The Question About The Brahmastra Release Date)

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमासाठी दिल्लीत पोहोचले. तिथे त्यांनी तिथल्या पत्रकारांशी संवाद साधला. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगही सुरू झाले आहे. रणबीर आणि आलियाच्या या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत,  हा बॉलिवूडचा सर्वात महागडा चित्रपट आहे. गरोदर असूनही आलिया या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडत नाहीये.

अशाच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये एका पत्रकाराने आलियाला चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत प्रश्न विचारला तेव्हा अभिनेत्री भडकली. सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागल्यामुळे त्याचा परिणाम अनेक चित्रपटांवर झाला. या ट्रेण्डमुळे अनेक मोठे चित्रपट फ्लॉप झाले.

त्यामुळे अशा परिस्थितीत चित्रपट प्रदर्शित करणे योग्य आहे की नाही अशी भीती सर्वांच्या मनात आहे. असाच प्रश्न एका पत्रकाराने आलियाला विचारला की चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी हे योग्य वातावरण आहे का?

त्यावेळी आलिया बहिष्काराच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत म्हणाली की कोणते वातावरण? उन्हाळा, हिवाळा… हवामान असे आहे. आता सप्टेंबर आहे आणि पुढचा महिना ऑक्टोबर सुरू होईल. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी हे अतिशय सुंदर वातावरण आहे. यावेळी आपण निरोगी आणि सुरक्षित राहणे आवश्यक आहे. आपल्या जीवनात आपल्याला जे मिळाले आहे त्याबद्दल आपण नेहमीच कृतज्ञ असले पाहिजे.

तुम्ही असे काहीही बोलू नका किंवा पसरवू नका. काहीही नकारात्मक नाही, सर्व काही सकारात्मक आहे. खूप दिवसांनी चित्रपटगृहेही सुरू होऊन आता चित्रपट प्रदर्शित होऊ लागले ही चांगली गोष्ट आहे. आम्हाला आमचे काम दाखवण्याची, ते प्रेक्षकांसमोर आणण्याची संधी मिळत आहे, त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानले पाहिजेत.

हा चित्रपट दाक्षिणात्य भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. अयान मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शक असून करण जोहर निर्माता आहे. या चित्रपटात शाहरुख खानचीही छोटी भूमिका असून अमिताभ आणि मौनी रॉय हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

आलियासोबतच रणबीरलाही काही प्रश्न विचारण्यात आले पण बहिष्काराच्या ट्रेण्डवर स्पष्टपणे बोलणे टाळले.

बॉयकॉट ब्रह्मास्त्र ही मागणी सुरू झाली आहे. रणबीर कपूरने एका जुन्या मुलाखतीत गोमांस खाण्याबद्दल काही विधाने केली होती त्यामुळे त्याला जोरदार विरोध केला जात आहे. यापूर्वी या विरोधामुळे आलिया आणि रणबीरला उज्जैनच्या महाकाल मंदिरातही प्रवेश दिला गेला नव्हता. तसेच आलियाने असेही म्हटले होते की, जर तुम्हाला मी आवडत नसेल तर माझे चित्रपट पाहू नका, यामुळे लोक चांगलेच संतापले आहेत.