इमरान खानसोबत शाहरुख खानचा ...

इमरान खानसोबत शाहरुख खानचा फोटो पाहून युजर्स भडकले : शाहरुखवर बहिष्काराची बिलामत येणार? (Boycott Shah Rukh Khan Trends On Twitter, Users Slams Him For His Photo With Imran Khan)

शाहरूख खानचा चाहतावर्ग जगभर पसरलेला आहे. पण कित्येकदा ट्रोलर्स त्याला लक्ष्य करतात. ही वेळ कालच आली. शाहरुख खान आणि त्याचा आगामी चित्रपट ‘पठान’ यावर बहिष्कार घालण्याची मागणी ट्रोलर्सनी सोशल मीडियावर केली आहे.

Boycott Shah Rukh Khan, Photo With Imran Khan

‘बॉयकॉट शाहरुख खान’ असे विधान ट्वीटर वर पसरले. युजर्सनी ही बंदी घालण्याची मागणी केली. हे सगळं अचानक सुरू झालं. शाहरूख विरुद्ध ही मोहीम का बरं सुरू झाली असावी?

Boycott Shah Rukh Khan, Photo With Imran Khan

सोशल मीडियावर एक जुना फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये शाहरूख, पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान सोबत दिसतो आहे. शाहरूख त्यांच्याकडे पाहून स्मित करतो आहे तर इमराननी शाहरुखच्या खांद्यावर हात ठेवला आहे. या फोटोवरूनच युजर्सचे ट्विट सुरू झाले असून त्यावर बंदीची मागणी करण्यात येत आहे.

Boycott Shah Rukh Khan, Photo With Imran Khan

तसं पाहिलं तर हा फोटो जुना आहे. भारत-पाक संबंध जरा बरे होते, तेव्हाचा. इमरान तेव्हा पंतप्रधान नव्हते. ते क्रिकेटपटू होते. पण ट्रोलर्स शाहरूखच्या मागे हात धुवून लागलेत. भारतात राहून शाहरुख पाकिस्तानची तारीफ करतो, असं ते म्हणताहेत.

Boycott Shah Rukh Khan, Photo With Imran Khan

एकीकडे शाहरुखवर बंदी आणण्याची मागणी सुरू असतानाच, त्याचे काही चाहते, त्याच्या समर्थनार्थ या मैदानात उतरले. ‘वुई लव्ह शाहरुख खान’, अशी त्यांची विधाने झळकू लागली आहेत. शाहरुखच्या घराबाहेर जमणारे त्याचे चाहते व तो त्यांना अभिवादन करत असल्याचे फोटो त्याचे समर्थक टाकत आहेत.

बऱ्याच काळानंतर शाहरुख ‘पठान’ या चित्रपटाने पडद्यावर दिसणार आहे. स्वाभाविकच चाहते त्याची वाट पाहत आहेत. २०१८ साली ‘झिरो’ या चित्रपटात तो दिसला होता. हा चित्रपट फ्लॉप झाला होता.