आलिया भट्ट वर बहिष्कार घाला : ‘ डार्लिंग्...

आलिया भट्ट वर बहिष्कार घाला : ‘ डार्लिंग्स ‘च्या प्रदर्शनाआधी ट्विटरवर जोर धरु लागली मागणी (‘Boycott Alia Bhatt’ Trends On Twitter Before Darlings Release)

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉयकॉट लाल सिंग चड्ढा आणि बॉयकॉट रक्षाबंधन हे ट्रेंड सुरु आहे. पण आता बॉयकॉटच्या या यादीत प्रेग्नंट आलिया भट्टचा आगामी चित्रपट ‘डार्लिंग’चाही समावेश करण्यात आला आहे.

बॉयकॉट आलिया भट्ट पुन्हा एकदा ट्विटरवर ट्रेंड होत आहे. हा चित्रपट 5 ऑगस्टला ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

पण प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच ट्विटरवर ‘BoycottAliabhatt’हे ट्रेंड होत आहे. गेले काही दिवस आलिया डार्लिंग्स चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. तिच्यासोबत शेफाली शाह, विजय वर्मा, आणि रोशन मॅथ्यूसुद्धा या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट  बदरूनिसा शेख नावाच्या मुस्लिम मुलीचे पात्र साकारत आहे.

  बदरूनिसा आपला पती  (विजय वर्मा)ला किडनॅप करून त्याचा बदला घेते. या चित्रपटातील एका दृश्यात आलिया आपल्या पतीचे हात बांधून त्याला पॅनने मारते, त्याच्या तोंडावर पाणी मारते. तसेच पतीचा चेहरा पाण्याच्या टाकीत बुडवते असे दाखवण्यात आले आहे.

आलिया भट्ट ट्रेंड होण्याचे कारण म्हणजे चित्रपटात अभिनेत्री पुरुषांच्या विरोधात आहे. ती घरगुती हिंसाचाराचे समर्थन करते असा लोकांचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे लोकांनी ट्विटरवर आलिया भट्टच्या चित्रपटावर बहिष्कार टाकला आहे.