हे वाचा: बाल दरबारातील आनंदमय सोहळा (Boring Gr...

हे वाचा: बाल दरबारातील आनंदमय सोहळा (Boring Grammer Made Easy For Children, Through Poetry)

Grammer Made Easy, Children, Poetry, eknath avhad, poetry book

बाल दरबारातील आनंदमय सोहळा


कविश्रेष्ठ एकनाथ आव्हाडांचा मशब्दांची नवलाईफ हा बाल काव्यसंग्रह म्हणजे विद्यादेवता श्री सरस्वती मातेच्या बाल दरबारातील एक आनंदमय असा सुंदर स्नेहसंमेलनाचा मंगलमय सोहळा आहे. मराठी भाषेचे वैभव वाढवणारा, मराठी भाषेची ताकद आणि महानता सिद्ध करणारा तसेच मराठी भाषेची अपरिहार्यता व शाश्वतता मान्य करायला लावणारा असा हा अनन्यसाधारण बालकविता संग्रह बालवाचकांसाठी मनोरंजक आणि उपयुक्त आहे.
एकनाथ आव्हाडांच्या लेखणीला दैवी स्पर्श आहे. मराठी व्याकरण अतिशय सोप्या रीतीने, गंमती गंमतीने, असंख्य प्रचलित-अप्रचलित मराठी शब्दांच्या वापरातून एकनाथ सरांनी ही कविता संग्रहाची कार्यशाळा सहजपणे मूर्त स्वरूपात उभारली आहे. त्यांची सिद्धहस्त व अमृताचा वर्षाव झालेली ती लेखणी! त्या लेखनसरितेचा हा पवित्र लेखनप्रवाह सतत वेगवेगळ्या प्रयोगशील अशा साहित्य निर्मितीद्वारे गतिमान होत आहे. कारण एकनाथ सरांचा एकच ध्यास आहे तो म्हणजे मुलांना अभ्यासाचा आनंद मिळून त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा. एक उत्तम शिक्षक असलेले एकनाथ सर याचसाठी सदैव तत्पर असल्यामुळे, तसेच त्यांना बालकाचं नाजुक, कोवळं, निरागस, जिज्ञासू असं संवेदनशील मन लाभलं असल्यामुळे या बालकविता संग्रहातील सर्व कविता त्यांच्या अनुभूतीतून स्फुरल्या आहेत. खरं म्हणजे त्यांची काव्यनिर्मिती शक्ती उपजतच आहे, या सर्व कवितांतून मराठी भाषेच्या व्याकरणाचा अभ्यासक्रम एकनाथ सरांच्या हृदयात आविष्कृत झाला व अगदी सहजपणे आपोआप त्यांनी तो कागदावर लिहून काढला. शब्दांच्या जुळवाजुळवीची ना कुठे कसरत झाली आहे किंवा ना कुठे ओढाताण झाली आहे.

Grammer Made Easy, Children, Poetry, eknath avhad, poetry book

मिश्कील पद्धतीने गुंफण
मराठी भाषेतील व्याकरण विभागातील जवळजवळ सर्व अभ्यासक्रम इतक्या आकर्षक, नेमक्या आणि मिश्कील पद्धतीने काव्यामध्ये गुंफला आहे की, मुलं स्वतःच स्वतःचा आधी क्लिष्ट व कंटाळवाणा वाटणारा व्याकरण विषयाचा अभ्यास आता स्वखुषीने, आनंदाने करू लागतील, नव्हे तो त्यांना सहजपणे कळत जाईल. त्यात त्यांना गोडी वाटू लागेल. यातूनच मराठी भाषेचा मान राखण्याचे, तिची शक्ती ओळखण्याचे भान लहान वयातच मुलांना राहू शकेल. मराठी भाषा जगली पाहिजे, जगवली पाहिजे याचे मर्म त्यांना यातील एकूण सत्तावीस कवितांमधून निःसंशय कळणारच. कारण या कवितांतील लय, ताल, गेयता, साधेपणा मुलांवर गारूड घालणार, यातले जुने नवे शब्द त्यांच्या निर्मळ मनावर जादू करणार.
दिलिपराज प्रकाशनने प्रकाशित केलेला व सुप्रसिद्ध चित्रकार संतोष घोंगडे यांच्या समर्पक व सुलेखन रेखाचित्रांच्या कल्पनांनी काढलेल्या देखण्या चित्रांनी सजवलेला हा काव्यसंग्रह अधिकच आकर्षक व मोहक झाला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉ. सुरेश सावंत यांची विस्तृत, अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. प्रस्तावना या शब्दापेक्षाही या काव्यसंग्रहाचे मउत्तम रसग्रहणफ हा शब्दप्रयोग जास्त संयुक्तीक वाटतो. थोडक्यात या काव्यसंग्रहातील सर्वच कविता लक्षवेधी आणि बालक-पालक सर्वांसाठीच वाचनीय, मनोरंजन व माहितीपूर्ण आहेत. संग्रही ठेवावा इतका हा काव्यसंग्रह महत्त्वाचा आहे

  • प्रियंवदा करंडे