दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या आठवणीत भावूक झाले...

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या आठवणीत भावूक झाले बोनी कपूर, शेअर केला पत्नीसोबतचा रोमॅण्टिक फोटो (Boney Kapoor shares unseen romantic pics with Late Sridevi in her memory)

बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांची आज पाचवी पुण्यतिथी आहे. अभिनेत्रीच्या आठवणीत तिचे पती आणि चित्रपट दिग्दर्शक बोनी कपूर यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना बोनी यांनी आपली पत्नी खूपच लाजाळू होती असे देखील सांगितले.

आपल्या दिवंगत पत्नीचे फोटो शेअर करताना बोनी यांनी लिहिले की – फक्त व्यक्त होत आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याने पत्नीला किस करतानाचा जुना फोटो शेअर केला. आणि इतर फोटोत, त्यांनी एकत्र घालवलेले आनंदाचे क्षण शेअर केले आहेत.

दिवंगत अभिनेत्रीला श्रद्धांजली अर्पण करत बोनी कपूरने आपल्या इन्स्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत बोनी कपूर यांनी श्रीदेवीसोबतची पहिली भेट आठवत एक व्हिडिओही शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करत बोनी कपूर यांनी लिहिले की, मी श्रीदेवीला पहिल्यांदा तामिळ चित्रपटात पाहिले होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर श्रीच्या पहिल्या नजरेत प्रेमात पडलो. त्यावेळी ऋषी कपूर यांच्यासोबत चित्रपट बनवण्याचा माझा विचार होता. ऋषी कपूरला स्क्रिप्ट दाखवण्यापूर्वी श्रीदेवीला भेटण्यासाठी मी चेन्नईला गेला होता, कारण त्या चित्रपटासाठी मला श्रीदेवीला हिरोइन म्हणून साइन करायचे होते.  पण त्यावेळी आमची भेट होऊ शकली नाही. पण श्रीदेवी कायमच माझ्या मनात ठसली होती.  

बोनीने व्हिडीओमध्ये असेही सांगितले की, श्रीदेवीसोबतची त्यांची पहिली भेट एखाद्या स्वप्नासारखी होती. ती खूप अबोल होती अनोळखी लोकांशी बोलत नव्हती. मी पण तिच्यासाठी अनोळखी होतो. ती माझ्याशी तोडक्या मोडक्या हिंदी आणि इंग्रजीत बोलली. मला तिचे शब्द खूप आवडले.

अभिनेत्रीची मुलगी जान्हवी कपूरनेदेखील काही दिवसांपूर्वी आपल्या आईसोबतचा गोड फोटो शेअर केला होता.