बोनी कपूरने सांगितले जान्हवी कपूर गुपित, लाजेने...

बोनी कपूरने सांगितले जान्हवी कपूर गुपित, लाजेने चूर झाली अभिनेत्री(Boney Kapoor Revealed Such a Secret of Daughter Janhvi Kapoor, Actress Got Embarrassed)

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लाडकी लेक जान्हवी कपूर ही बॉलिवूडची सध्याची आघाडीची तरुण अभिनेत्री आहे. तिने फार कमी वेळात इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली.आपल्या दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली. येत्या काळात जान्हवीचा ‘मिली’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सध्या ती आपले वडील बोनी कपूर यांच्यासोबत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.बोनी कपूर यांनी आपली मुलगी जान्हवी कपूरशी संबंधित असाच एक प्रसंग सर्वांसोबत शेअर केला. ते ऐकून जान्हवी लाजेने चूर झाली.

जान्हवी आपले वडील बोनी कपूरसोबत कॉमेडी किंग कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसणार आहे. या शोमध्ये बोनी कपूरने आपल्या मुलीशी संबंधित अनेक रहस्ये उघड केली. ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये प्रत्येक आठवड्यात वेगवेगळे कलाकार येऊन प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतात.

नुकताच ‘द कपिल शर्मा शो’चा नवा सीझन सुरू झाला आहे. या शोमध्ये खूप धमाल-मस्ती असल्यामुळे तसेच या मंचावर कलाकारांची अनेक गुपिते उघड केली जात असल्यामुळे प्रेक्षकांना हा शो खूप आवडतो. बोनी कपूर यांनी या शोमध्ये जान्हवी कपूरचे एक रहस्य शेअर केले.

त्यामुळे जान्हवी खूप लाजली.नुकताच या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला. त्यात बोनी कपूर म्हणाले की, मी जेव्हाही जान्हवीच्या रूममध्ये जातो तेव्हा मला तिथे तिचे कपडे इकडे-तिकडे विखुरलेले दिसतात. टूथपेस्टचे झाकण उघडे असते. ती फ्लश तरी स्वतः करते हे आमचे नशीब. हे सर्व ऐकून जान्हवी लाजेने अगदी गोरीमोरी झालेली पाहायला मिळते.

जान्हवीचा ‘मिली’ हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणारा आहे.विशेष म्हणजे जान्हवीचा हा आपल्या वडिलांसोबतचा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली आहे. याशिवाय ‘तख्त’, ‘बॉम्बे गर्ल’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस’मध्येही जान्हवी दिसणार आहे.