बॉलिवूडची लेडी शाहरुख खान आहे क्रिती सेनन, असा ...

बॉलिवूडची लेडी शाहरुख खान आहे क्रिती सेनन, असा होता दिल्ली ते मुंबईतला 8 वर्षांचा प्रवास (Bollywood’s Lady Shahrukh Khan Is Kriti Sanon, This Is The Journey Of 8 Years From Delhi To Mumbai)

अभिनेत्री क्रिती सेनन हिने बॉलिवूडमध्ये बऱ्यापैकी आपला जम बसवला आहे. सध्या तिच्याकडे वेगवेगळ्या चित्रपटांच्या रांगा लागलेल्या असतात. क्रिती दिल्लीतल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली मुलगी आहे. तिने अभिनय क्षेत्रात करीअर करण्याचे आपले स्वप्न सत्यात उतरवून दाखवले. पण या क्षेत्रात येण्यापूर्वी तिने इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर अभिनयाला सुरुवात केली. इंडस्ट्रीत तिचा कोणीच गॉड फादर नाही.

क्रिती सेनन हिने आधी मॉडेलिंग केली आणि नंतर तिला ‘हिरोपंती’ चित्रपटात कास्ट करण्यात आले होते. क्रितीचा हा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. क्रितीला आता दिल्लीहून मुंबईत येऊन 8 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या वर्षांत तिने खूप काही साध्य केले आहे.

आजच्या काळात क्रिती ही इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘मिमी’ या चित्रपटासाठी तिचे खूप कौतुक करण्यात आले. या चित्रपटासाठी तिला आयफा आणि फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

ज्याप्रमाणे शाहरुख खानने दिल्लीहून मुंबईत आल्यानंतर इंडस्ट्रीत स्वत:चे नाव कमावले, त्याचप्रमाणे क्रिती सेनन हिने देखील दिल्लीहून मुंबईत येऊन लोकांच्या मनात घर केले. तुमच्यात जिद्द असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, हे त्यांनी सिद्ध केले.

शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशाह म्हटले जात असले तरी अवघ्या 8 वर्षात क्रितीनेही बरेच यश मिळवले आहे. त्यामुळेच तिला बॉलिवूड इंडस्ट्रीची लेडी शाहरुख खान म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

प्रत्येक आउटसाइडर्ससाठी क्रिती हे एक चांगले उदाहरण आहे. तिने लुका चुप्पी, मिमी आणि बरेली की बर्फी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम