नग्न चित्र प्रदर्शित करून ड्रेसची फॅशन करणाऱ्या...

नग्न चित्र प्रदर्शित करून ड्रेसची फॅशन करणाऱ्या सोनम कपूरला चाहत्यांची तीव्र नाराजी (Bollywood’s Fashion Icon Sonam Kapoor Got Trolled Over Wearing Weird Dress)

अनिल कपूरची लाडाची लेक आणि बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर बरेचदा तिची स्टाइल आणि आऊटफिट्‌स यामुळे चर्चेत असते. वेगळा अंदाज आणि लुक्समुळे ती सतत प्रकाशझोतात राहते. आताही ती तिच्या ड्रेसच्या फॅशनमुळे चर्चिली जात आहे. परंतु, यावेळी तिने घातलेल्या कपड्यांमुळे तिला चाहत्यांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. तिच्या कपड्यांच्या विचित्र फॅशनमुळे सोशल मीडियावर तिला चाहत्यांची नाराजी सहन करावी लागत आहे.

Bollywood, Sonam Kapoor, Wearing Weird Dress

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

अलीकडेच, सोनम कपूर लंडनमध्ये एका पार्टीत काफ्तानासारखा विचित्र ड्रेस घालून पोहोचली. सोनमच्या या ड्रेसवर एका महिलेची फिगराकृती दिसते. हा क्रीम रंगाचा ड्रेस डिझायनर रोक्सेंडा इलिन्सिकच्या ऑटम विंटर २०२१ ह्या कलेक्शनमधून घेतला असल्याचे समजते. परंतु खेदाची गोष्ट म्हणजे या ड्रेसमधील सोनम कपूरची छायाचित्रे समोर येताच लोकांनी तिचे कौतुक करण्याऐवजी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

Bollywood, Sonam Kapoor, Wearing Weird Dress

खरं तर, सोनम कपूरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून तिची ही काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत, ज्यात ती तिचा विचित्र ड्रेस दाखवत कॅमेऱ्यासाठी पोझ देत आहे. ही चित्रे पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी सोनमच्या या ड्रेसवर विनोद केले आहेत.

एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, जर रणवीर सिंगला कळले तर तो हा ड्रेस घेण्यासाठी येईल. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे – पैसे संपले आहेत, म्हणून पडदे घालतात. तरीही सोनमच्या या पोस्टला आतापर्यंत ४१०,६८२ लाईक्स मिळाले आहेत. एवढ्या वेगाने तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

Bollywood, Sonam Kapoor, Wearing Weird Dress

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

बॉलिवूडच्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये सोनम कपूरने तिचं अभिनय कौशल्य दाखविलं असलं तरी ती तिच्या फॅशन सेन्ससाठी अधिक प्रसिद्ध आहे. स्वतः स्टायलिश असलेली सोनम इतरांना फॅशन टिप्स देण्यात कधीच मागे पडत नाही. मात्र, असे करताना तिला बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोलिंगला बळी पडावे लागते एवढंच.

सोनम कपूरने २०१८ मध्ये दिल्लीतील उद्योगपती आनंद आहुजासोबत लग्न केले आहे. सोनमचे पती आनंद आहुजा हे शाही एक्सपोर्ट्सचे मालक हरीश आहुजा यांचे नातू आहेत आणि ते या कंपनीत व्यवस्थापकीय संचालक आहेत. सोनम तिच्या पतीसोबत लंडनमध्ये राहते, जिथून ती अनेकदा पती आनंद आहुजासोबत तिचे रोमँटिक फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.