स्वतःची जेट विमाने बाळगणारे सुपरस्टार्स (10 Bol...

स्वतःची जेट विमाने बाळगणारे सुपरस्टार्स (10 Bollywood Super Stars Who Own Private Jets)

गेल्या काही वर्षांपासून  बॉलिवूडचे टॉप स्टार्स कोट्यवधी रुपये कमावू लागले आहेत. परिणामी ते ऐषारामी जीवन जगत आहेत. अद्ययावत महागड्या मोटारगाड्या , आलिशान बंगले अशी त्यांची संपत्ती आहे. श्रीमंती जीवनशैलीची साधने आहेत. दागदागिने किती असतील त्याची कल्पनाच न केलेली बरी. आता त्यांनी आपल्या श्रीमंती जीवनशैलीत जेट विमानांची भर टाकली आहे. होय! या सुपरस्टार्स कडे स्वतःची जेट विमाने असून त्यामधून ते स्वतः आपल्या कुटुंबासह प्रवासाला जातात. स्वतःच्या मालकीच्या विमानांमधून आकाशात विहार करणारे हे सुपरस्टार्स कोण आहेत  ते पाहूया :

अक्षय कुमार 

निर्व्यसनी व तद्दन व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध असलेला अक्षय कुमार , खिलाडी कुमार म्हणून ओळखला जातो  . त्याने आपल्या सोयीसाठी खासगी जेट विमान बाळगले आहे. या विमानाची किंमत २६० कोटी रुपये आहे , असं सांगितलं जातं . चित्रपटाचे प्रमोशन आणि प्रदेशात शूटिंगला जायचे असल्यास तो या विमानाचा वापर करतो. शिवाय आपल्या कुटुंबासह सुट्टी घालविण्यासाठी तो यामधून सैर करतो.

अजय देवगण :

अजयला उंची मोटारगाड्यांचा भारी शौक आहे. मासेराती क्वाट्रोपोर्ट, बीएमडब्ल्यू झेड ४, ऑडी ए ५ स्पोर्टबॅक अशा महागडया त्याच्या संग्रही आहेत. शिवाय त्याने स्वतःचे जेट विमान बाळगले आहे. हॉकर ८०० हे त्याचे खासगी विमान असून ते ६ आसनी आहे. काजोल आणि मुलांसह तो या स्वतंत्र जेट विमानाने सैरसपाटा करतो.

शाहरुख खान :

शाहरुख ची जीवनशैली एखाद्या बादशहा सारखी आहे. म्हणूनच की काय, त्याला बादशहा खान म्हणतात. त्याला शोभेल असे, त्याचे स्वतंत्र जेट विमान आहे. २०१६ साली एका मुलाखतीत त्याने म्हटले होते की , मला स्वतःचे विमान खरेदी करायचे आहे. पण आता पैसे नाहीत. पुढे पैसे आले नि त्याने आपली आकांक्षा पूर्ण केली. 

सैफ अली खान :

छोटे नबाब म्हणून नावाजलेल्या सैफ अली खानकडे स्वतःचे जेट विमान आहे. तो खानदानी श्रीमंत असल्याने हा शौक त्याने सहज पूर्ण केला. स्वतःच्या या विमानाने तो करिना व मुलांसह आकाशात विहार करतो.

अमिताभ बच्चन :

अभिनय आणि लोकप्रियतेच्या बाबतीत वरील सर्व तरुण सितारे त्याच्यापुढे खुजे वाटतील . शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन, त्यांच्यापेक्षा मागे राहील , हे शक्यच नाही. अमिताभने या सर्वांआधी स्वतःचे जेट विमान बाळगले आहे. या विमानाच्या अंतर्भागातील छायाचित्रे त्याने सोशल मीडियावर प्रसारित केली आहेत.

माधुरी दीक्षित -नेने :

फक्त अभनेते कोट्याधीश आहेत असं नाही. निव्वळ अभिनेते नव्हे तर बॉलिवूडमधील अभिनेत्री देखील कोट्याधीश आहेत. अन स्वतःचे खासगी विमान बाळगण्याबाबत त्याही कमी नाहीत. एकेकाळी अव्व्ल अभिनेत्री असलेली माधुरी दीक्षित , डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करून अमेरिकेत स्थायिक झाली. डॉक्टर साहेब देखील तिच्या इतकेच श्रीमंत होते. माधुरीने अमेरिकेत संसार केला अन इथे मुलाबाळांसह मायदेशी परतली. ऐषारामी जीवनाची तिला पहिल्यापासूनच आवड होती. त्यामुळे माधुरी व डॉक्टर श्रीराम यांचे स्वतःचे जेट विमान आहे. त्यामधून ती मुलाबाळांसह फिरायला जाते.

प्रियांका चोप्रा :

हिंदी चित्रसृष्टी बरोबरच परदेशी चित्रसृष्टी गाजविलेली प्रियांका चोप्रा स्वतःचे खासगी जेट विमान बाळगून आहे. इथून अमेरिकेत जाणे येणे करण्यासाठी स्वतःचे हे विमान वापरते. शिवाय आपली प्रिय आई व इतर कुटुंबियांसह सुटटी घालविण्यासाठी ती या विमानाचा वापर करते.

शिल्पा शेट्टी :

आपली शरीरयष्टी सडसडीत ठेवण्यात कामयाब ठरलेली शिल्पा शेट्टी स्वतःचे जेट विमान बाळगून आहे. नवरा-मुलांसह ती या विमानाने फिरते.

सनी लिओन : वरील अभिनेत्री इतकी सिनेसृष्टीत टॉपवर पोहचली नसली तरी सनी लिओनने चांगलीच माया जमवली आहे. एकेकाळी मुंबईमध्ये ती स्वतःच्या घरासाठी संघर्ष करीत होती. पण आता तिने स्वतःचे जेट विमान कमावले आहे. त्यातून ती नवऱ्याबरोबर फेरफटका मारते.त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.