मुलीच्या वयातील तरुणींशी लग्न केलेले अभिनेते (B...

मुलीच्या वयातील तरुणींशी लग्न केलेले अभिनेते (Bollywood Stars Who Married A Girl Of Their Daughter’s Age)

कबीर बेदी

गाजलेला प्रेमवीर अशी कबीर बेदीची ख्याती आहे. त्याने २००५ साली परवीन दुसांज या तरुणीशी लग्न केलं होतं. ही परवीन, त्यावेळी कबीरपेक्षा ३३ वर्षांनी लहान होती. इतकी की, कबीरची मुलगी पूजा बेदी हिच्यापेक्षा देखील ती वयाने लहान होती. विशेष म्हणजे कबीरचं हे चौथं लग्न होतं.

दिलीपकुमार

वयाची नव्वदी पार केलेल्या दिलीपकुमारची तब्येत अलिकडे तोळामासा असते. पण त्याची बायको सायरा बानू त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ करते. पण सायराने, दिलीपसाहेबांशी लग्न केलं होतं तेव्हा ती २२ वर्षांची होती. अन्‌ दिलीपकुमार ४४ वर्षांचा होता. या दोघांच्या वयात २२ वर्षांचं अंतर आहे.

संजय दत्त

संजय दत्तची बायको मान्यता त्याच्यापेक्षा १९ वर्षांनी लहान आहे. संजूबाबाचं हे तिसरं लग्न आहे. मान्यताने त्याच्या संसाराची घडी नीट ठेवली आहे.

राजेश खन्ना

सुपरस्टार राजेश खन्नाने डिंपल कापडियाशी लग्न केलं तेव्हा त्याच्या चाहतेवर्गात जणू धरणीकंप झाला होता. कारण तो लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर होता. अन्‌ लाखो तरुणींची धडकन होता. लग्नप्रसंगी राजेश खन्ना होता ३१ वर्षांचा, तर डिंपल होती फक्त १६ वर्षांची. या दोघांचं लग्न त्या काळात हाय प्रोफाइल गणलं गेलं होतं.

मिलींद सोमण

मिलींद सोमणने जिच्याशी लग्न केलं आहे, ती अंकिता कुंवर, त्याच्यापेक्षा २६ वर्षांनी लहान आहे. त्याच्या लग्नापेक्षा, दोघांच्या वयातील अंतराची तेव्हा चर्चा झाली होती. याबाबत मिलींद बोलला होता की, प्रत्येकाला प्रेम करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. अंकिता आणि माझ्या वयात जेवढं अंतर आहे, तेव्हढंच माझं आणि आईच्या वयात अंतर आहे. या गोष्टीने नात्यामधील प्रेमावर काही परिणाम होत नाही…

खाली दिलेल्या सिताऱ्यांमध्ये देखील वयाचं बऱ्यापैकी अंतर आहे –

सैफ – करीना

या दोघांच्या वयात १० वर्षांचा फरक आहे. सैफ अली खानने, अमृता सिंहशी पहिलं लग्न केलं, तेव्हा करीना १० वर्षांची मुलगी होती.

शाहिद कपूर – मीरा राजपूत

करीना कपूरशी ब्रेकअप झाल्यावर शाहिद कपूर मनाने खचला होता. पण मीरा राजपूत त्याच्या जीवनात आली, अन्‌ तो सावरला. दोघांचा संसार आता चांगला चालला आहे. पण ही मीरा, शाहिदपेक्षा १४ वर्षांनी लहान आहे.

रितेश देशमुख- जेनेलिया

रितेश व जेनेलिया दोघेही दिसायला देखणे आहेत. अन्‌ एकमेकांना अनुरूप अशी ही जोडी आहे. पण दोघांच्या वयात ९ वर्षांचं अंतर आहे.