बायको – मुलांना सोडून प्रेयसीच्या नादी ला...

बायको – मुलांना सोडून प्रेयसीच्या नादी लागलेले बॉलिवूडचे स्टार्स (Bollywood Stars Who Dumped Their Partners And Are Enjoying Live In Relationship)

बॉलिवूडमध्ये एकीला सोडून दुसऱ्या बाईच्या नादी लागणारे काही बदफैली कलाकार आहेत. त्यांनी चक्क आपल्या बायकोला सोडले आणि सुंदर प्रेयसी सोबत लग्न न करताच राहत आहेत – लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये.

अर्जुन रामपाल

मध्यंतरी अमली पदार्थांच्या प्रकरणात अर्जुन रामपाल चांगलाच चर्चेत आला होता. त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला हिच्यामुळे तो या प्रकरणात बदनाम होत असल्याचे दिसून येत होते. गॅब्रिएला सोबत तो बऱ्याच दिवसांपासून लग्न न करताच राहतोय्‌. या अर्जुनने सुपर मॉडेल म्हणून गाजलेल्या मेहेर जेसियाशी १९९८ साली लग्न लावले होते. त्यांना दोन मुली झाल्या. मोठी मुलगी माहिका १८ वर्षांची, तर धाकटी मायरा १५ वर्षांची आहे.

एवढ्या मोठ्या वयाच्या दोन मुली असूनसुद्धा २० वर्षे संसार केल्यानंतर अर्जुन रामपालने मेहेरशी संबंध तोडले. काही बातम्या अशा आहेत की, अर्जुन-मेहेरचा संसार, हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची बायको सुझान खान होती. मेहेरशी घटस्फोट झाल्यानंतर अर्जुन, आपली परदेशी प्रेयसी गॅब्रिएला डेमेट्रिएडस्‌ हिच्यासह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतोय्‌.

गॅब्रिएला ही मूळची दक्षिण आफ्रिकेतील मॉडेल व अभिनेत्री आहे. बिनलग्नाची असून अर्जुन तिच्यापासून झालेल्या मुलाचा बाप बनला आहे. तिच्यासोबत तो अधूनमधून सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत असतो.

फरहान अख्तर

फरहानने अधुना या तरुणीशी २००० साली लग्न लावले. १६ वर्षे संसार केल्यावर ते वेगळे झाले. काय तर म्हणे, परस्परांतील मतभेदांमुळे त्यांनी काडीमोड देण्याचा निर्णय घेतला. त्यांना दोन किशोरवयीन मुली आहेत. शाक्या आणि अकिरा ही त्यांची नावे. या लहान वयातील मुलींना आपल्या घटस्फोटाबद्दल माहिती देणं, हा आपल्या जीवनातील कसोटीचा क्षण होता, असं फरहानने एका मुलाखतीत सांगितलं होतं. अधुनाला सोडून फरहान, मॉडेल आणि व्हिडिओ जॅकी शिबानी दांडेकर हिच्याशी संबंध ठेवून आहे.

बायकोला सोडचिठ्ठी दिल्यावर वर्षभरातच फरहानने सोशल मीडियावर आपल्या नव्या प्रेमपात्राची अधिकृत घोषणा केली होती. आपले डेटिंग आणि व्हेकेशनच्या पोस्टस्‌ व व्हिडिओ फरहान व शिबानी सोशल मीडियावर टाकत असतात. आता हे दोघे बिनलग्नाचे राहत असले, तरी लवकरच लग्न करण्याची तयारी ते करत आहेत.

मात्र आपल्या दोन्ही मुलींशी फरहान आपले संबंध ठेवून आहे. त्यांच्या भेटीगाठी होत असतात. हाती आलेल्या वृत्तानुसार अधुनाने आपला नवा मार्ग स्वीकारला आहे. ती एका बिझनेसमनशी डेट करते आहे.

अरबाज खान

पाच वर्षे डेटिंग केल्यावर अरबाज खानने, मलायका अरोराशी १९९८ मध्ये लग्न केलं. दोघांची प्रेमकथा बॉलिवूडमध्ये चांगलीच प्रसिद्ध आहे. चांगलं जोडपं म्हणून लोक त्यांची भलामण करतात. पण २० वर्षे एकत्र राहिल्यावर या दोघांचं पटेनासं झालं आणि ते वेगळे झाले.

मलायकाशी तलाक घेतल्यावर अरबाज खानच्या जीवनात २२ वर्षांनी लहान असलेल्या इटालियन मॉडेल जॉर्जियाचा प्रवेश झाला. दोघे बिनलग्नाचे राहतात. अरबाजचा मुलगा अरहान १७ वर्षांचा आहे. त्याचे जॉर्जियाशी चांगले पटते.

घटस्फोटानंतर मलायका अरोराने आपला मार्ग चोखाळला. अन्‌ ती खूप दिवसांपासून अर्जुन कपूरशी डेट करते आहे.