फुरसतीच्या वेळेचा सदुपयोग करणारे बॉलिवूड कलाकार...

फुरसतीच्या वेळेचा सदुपयोग करणारे बॉलिवूड कलाकार (Bollywood Stars Do These Things To Make Their Spare Time Special)

बॉलिवूडचे लोकप्रिय सितारे शूटिंग, डबिंग या कामात गर्क असतात. त्यांचा जास्तीत जास्त  वेळ या कामातच व्यतीत होतो. पण या व्यस्त कार्यक्रमातून त्यांना फुरसत मिळते तेव्हा, ते काय करतात, हे तुम्हाला ठाऊक आहे का? चला तर मग बघूया, फुरसतीच्या वेळेचा ते कसा सदुपयोग करतात…

सलमान खान

सलमान खानच्या चाहत्यांना एवढंच माहीत आहे की, त्याला बाईक्स आणि मोटर कार्सचा छंद आहे. पण त्याला आणखीही एक चांगला छंद आहे, ज्याची चाहत्यांना कल्पना नसावी. फुरसतीच्या वेळेत सलमान पेन्टिन्ग करतो. चित्रकलेत त्याचा हात चांगला चालतो. त्यामुळे त्याने काढलेली चित्रे महागड्या दराने विकली गेली आहेत.

अमिताभ बच्चन

महानायक अमिताभ बच्चन, वाढत्या वयातही शूटिंग – डबिंग करतो. त्यामधे तो बिझी असतो. पण वेळ मिळाला की, तो लेखन करतो. आपले फुरसतीचे क्षण तो कविता लिहिण्यात व्यतीत करतो. जणू आपले पिताजी हरिवंशराय बच्चन यांचा तो वारसा चालवतो. तसेच तो ब्लॉग लिहितो.

शाहरूख खान

बॉलिवूडचा किंग खान अर्थात्‌ शाहरूख खानकडे तसा इतर काही कामांना वेळ कमीच असतो. पण वेळ मिळाला की, तो व्हिडिओ गेम खेळतो. त्याच्या संग्रही लेटेस्ट व्हिडिओ गेम्स आहेत आणि ते खेळून तो टाइम पास करतो.

आमीर खान

मिस्टर परफेक्शनिस्ट याचीही तीच तऱ्हा आहे. त्याच्याकडे पण टाइम पास करायला टाइम कमीच असतो. पण जेव्हा त्याला फुरसत लाभते, तेव्हा तो आवडीने ड्रम वाजवतो. ड्रम वाजविणे हा त्याचा आवडता छंद आहे.

सैफ अली खान

बॉलिवूडचे छोटे नवाब सैफ अली खान हा वरील मोठ्या कलावंतांइतका बिझी नसला तरी इतर काही उद्योग करत असतो. त्यातून वेळ मिळताच तो गिटार वाजवतो. सैफ बऱ्याच वर्षांपासून गिटार वाजवतो आहे. गिटार वाजवण्याने कामाचा शीण निघून जातो आणि एका अद्‌भूत शांतीचा अनुभव येतो, असं तो म्हणतो.

श्रद्धा कपूर

बॉलिवूडची तरुण अभिनेत्री श्रद्धा कपूर चांगलीच बिझी असते. मात्र फावल्या वेळात बागकाम करायला तिला खूप आवडते. तिला हिरवळ, हिरवी पानं खूप आवडतात. म्हणून ती बागेतील झाडाझुडुपात काम करून आपल्या फावला वेळ घालवते.

आलिया भट्ट

आलिया भट्ट बॉलिवूडची चुलबूली अभिनेत्री. आलिया भट्टला कामाची कमतरता नाही. त्यातून वेळ मिळताच ती पेन्टिन्ग करते. आलिया खास करून चारकोल पेन्टिन्ग करते. असं एक चित्र तिने अर्जुन कपूरला भेट दिलं आहे.

हृतिक रोशन

निवडक चित्रपट करत असला तरी हृतिक रोशन चांगलाच बिझी असतो. त्याला फोटोग्राफीची आवड आहे. तेव्हा वेळ मिळताच तो फोटोग्राफी करतो. छान छान फोटो काढून आपल्याला मिळालेल्या वेळेचा तो सदुपयोग करतो.

रणदीप हुडा

वैशिष्ट्यपूर्ण भूमिका करण्यात रणदीप हुडाने नाव कमावलं आहे. तो स्पोर्टस्‌मध्ये पण ॲक्टीव आहे. त्याला स्पोर्टस्‌मध्ये बरीच ॲवॉर्डस्‌ मिळाली आहेत. पण जेव्हा त्याला फावला वेळ मिळतो तेव्हा तो घोडेस्वारी करतो. त्याने स्वतःचे फार्म हाऊस केले असून त्यात काही घोडे पाळले आहेत. त्या घोड्यांवर रपेट करून रणदीप आपला वेळ घालवतो.