बॉलिवूड स्टार्सची संक्रांत ...

बॉलिवूड स्टार्सची संक्रांत (Bollywood stars Celebrates Sankranti)

नवीन वर्षातील पहिलाच सण म्हणून मकरसंक्रांतीचं विशेष महत्त्व आहे. तिळगुळाची देवाणघेवाण करून, पतंगा उडवून संक्रांत साजरी करण्याची आपली प्रथा आहे. बॉलिवूडच्या सिताऱ्यांनी या निमित्ताने शुभेच्छा देत आपली छायाचित्रे पोस्ट केली आहेत.

अलिकडेच राजकारणात सक्रीय झालेल्या उर्मिला मातोंडकरने तिळगूळ घ्या, गोड गोड बोला. मकरसंक्रांतीच्या आनंददायी शुभेच्छा; असं म्हटलं आहे.

‘त्रिभंगा – टेढी मेढी क्रेझी’ या हिंदी चित्रपटाद्वारे वेब पोर्टल झालेली दिग्दर्शिका रेणुका शहाणे हिने अशाच गोड शुभेच्छा दिल्या आहेत.

माधुरी दीक्षित-नेने हिने संक्रांती बरोबरच दक्षिणेकडे साजरा केला जाणाऱ्या पोंगलच्या व उत्तरेकडे साजरा केला जाणाऱ्या लोहडी या सणाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत.

उत्तरेकडे साजरा केला जाणारा लोहडी सण शिल्पा शेट्टीने आपले पती राज कुंदरा यांच्यासह साजरा केला. आपली लहान मुलगी समिषा हिला राजने कडेवर घेतले आहे. तिचा हा पहिलाच सण आहे.

अमिताभ बच्चनने आपल्या कुटुंबियांसोबत लोहडी उत्साहात साजरी केली. जया बच्चन, ऐश्वर्या राय, नात आराध्या यांनी त्यात भाग घेतला.

रणबीर कपूरनेही लोहडीचा पूर्ण आनंद घेतला. स्वतः लोहडी पेटवून सण साजरा केला.