बॉलिवूडमध्ये लग्नाची धामधूम; पण हे अविवाहित सित...

बॉलिवूडमध्ये लग्नाची धामधूम; पण हे अविवाहित सितारे कधी करणार लग्न?- चाहत्यांना पडलेला प्रश्न (Bollywood Stars Are Still Bachelors : Fans Are Eagerly Waiting For Their Marriage)

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाची धामधूम आहे. कतरिना कैफचे हात पिवळे झाले, तर अंकिता लोखंडेचा मेंदी समारंभ रंगला आहे. त्यामुळे बॉलिवूडचे जे सितारे अद्याप कुंवारे राहिले आहेत, ते बोहल्यावर कधी चढणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

सलमान खान

Bollywood Stars, Bachelors, Marriage, अविवाहित सितारे, बॉलिवूड

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून सलमान खान पहिल्या क्रमांकावर आहे. त्याची अनेक प्रेमप्रकरणे झाली आहेत. पण तो लग्नाच्या बंधनात अडकलेला नाही. त्यामुळे त्याच्या शादीचा लोकांना फारच इंतजार आहे.

रणबीर कपूर

Bollywood Stars, Bachelors, Marriage, अविवाहित सितारे, बॉलिवूड

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

आपली गर्लफ्रेंड आलिया भट्टशी, रणबीर कपूर विवाहबद्ध होणार असल्याच्या चर्चा जोरात आहेत. पण त्या आघाडीवर अद्याप सामसूम दिसते आहे.

आलिया भट्ट

Bollywood Stars, Bachelors, Marriage, अविवाहित सितारे, बॉलिवूड

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

बॉलिवूडच्या अविवाहित अभिनेत्रींच्या यादीत आलिया भट्टचे नाव वर आहे. रणबीर कपूरबरोबर तिची यादी होणार असल्याच्या बातम्या झळकतात, पण या शादीला अजून पावेतो मुहूर्त लागलेला नाही.

सिद्धार्थ मल्होत्रा

Bollywood Stars, Bachelors, Marriage, अविवाहित सितारे, बॉलिवूड

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

बॉलिवूडचा देखणा नट सिद्धार्थ मल्होत्राचं नाव कधी आलिया भट्टशी जोडलं गेलं होतं, परंतु आता सिद्धार्थ, कियारा अडवाणीशी डेट करतो आहे. त्यामुळे हे दोघे कधी लग्न करतात, याची लोकांना उत्सुकता आहे.

कियारा अडवाणी

Bollywood Stars, Bachelors, Marriage, अविवाहित सितारे, बॉलिवूड

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

सिद्धार्थ मल्होत्राचा उल्लेख झाला तर कियारा अडवाणीला कसं वगळता येईल. मिळालेल्या खबरांनुसार कियारा, या सिद्धार्थशी रिलेशनशिपमध्ये आहे. पण त्याचे या दोघांनी समर्थन केलेले नाही.

अर्जुन कपूर

Bollywood Stars, Bachelors, Marriage, अविवाहित सितारे, बॉलिवूड

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अर्जुन कपूर, मलायका अरोरासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे काही आता गुपित राहिलेलं नाही. पण लग्नाचा विषय काढला की, दोघेही तोंडावर बोट ठेवतात.

अक्षय खन्ना

Bollywood Stars, Bachelors, Marriage, अविवाहित सितारे, बॉलिवूड

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अक्षय खन्नाने आता वयाची चाळिशी पार केली आहे. पण तो कुंवारा राहिला आहे. सिनेमात त्याने प्रेमाचे, लग्नाचे प्रसंग अभिनीत केले आहेत. पण प्रत्यक्ष जीवनात, तो लग्नाच्या बोहल्यावर कधी चढणार, कोणास ठाऊक.

सुश्मिता सेन

Bollywood Stars, Bachelors, Marriage, अविवाहित सितारे, बॉलिवूड

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

एकल माता म्हणून सुश्मिता सेन आपली जिंदगी चांगली जगत आहे. दोन दत्तक मुलींची ती अविवाहित आई झाली आहे. तिचं नाव बऱ्याच लोकांशी जोडलं गेलं होतं, पण तिने लग्न केले नाही.

अमिषा पटेल

Bollywood Stars, Bachelors, Marriage, अविवाहित सितारे, बॉलिवूड

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अमिषा पटेल देखील अद्याप बिनलग्नाची राहिली आहे. तिच्या बऱ्याच प्रेमप्रकरणांच्या चर्चा गाजल्या होत्या, पण लग्नापर्यंत ते संबंध पोहचले नाहीत. आता तरी तिची लग्न घटिका भरते का, ते पाहायचे.

तब्बू

Bollywood Stars, Bachelors, Marriage, अविवाहित सितारे, बॉलिवूड

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

तब्बू सोबत काम केलेले बरेच स्टार्स शादीशुदा झाले. मुलांचे बापही झालेत. पण तब्बू या सुखाला वंचित राहिली आहे. तिनेही वयाची चाळिशी पार केली आहे, पण लग्नाचा विचार तिच्या डोक्यात आलेला नाही.