मराठी चित्रपट प्रश्नमंजुषा – दादा कोंडके
मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचे बादशहा दादा कोंडके यांनी ओळीने ६-७ चित्रपट असे हिट दिले होते की, त्यांनी रौप्यमहोत्सव साजरे केले. अन् हा अनोखा विक्रम नोंदला गेला. या महान कलाकाराच्या जीवनावरील ही प्रश्नमंजुषा –
दादा कोंडके यांचं खरं नाव काय होतं?
दादा कोंडके यांनी निर्माण केलेला पहिला चित्रपट कोणता?
दादा कोंडके यांची पडद्यावरील प्रेमळ आणि खाष्ट आई कोणत्या अभिनेत्रीने साकार केली होती?
दादा आपल्या चित्रपटाचे शूटिंग कोणत्या गावी करत असत?
दादा कोंडके यांच्यावर चित्रित झालेलं ढगाला लागली कळ हे गाणं कोणत्या चित्रपटात आहे?
दादा कोंडके यांना रुपेरी पडद्यावर सर्वप्रथम संधी कोणत्या दिग्दर्शकाने दिली?
दादांच्या सगळ्यात जास्त चित्रपटांना कोणी संगीत दिलं आहे?
दादांची सगळ्यात लोकप्रिय नायिका कोण होती?
ह्योच नवरा पायजे या चित्रपटात दादांची नायिका कोण होती?
मादक सौंदर्याचा ॲटम बॉम्ब पद्मा चव्हाण हिने दादांच्या कोणत्या चित्रपटात भूमिका केली होती?
दादा कोंडके यांची प्रमुख भूमिका असलेलं आणि तुफान गाजलेलं लोकनाट्य कोणतं?
दादा कोंडके यांनी काढलेला पहिला हिंदी चित्रपट कोणता?
Your score is
Restart quiz
Please rate this quiz