बॉलिवूड अभिनेत्रींचे झुमका प्रेम (Bollywood Div...

बॉलिवूड अभिनेत्रींचे झुमका प्रेम (Bollywood Divas, Who Likes The Zumka Most)


बॉलिवूडमधील अभिनेत्री एरव्ही आपल्या कामाची गरज म्हणून प्रत्येक व्यक्तिरेखेप्रमाणे सजत असतात. परंतु, कामाव्यतिरिक्त आपल्या खासगी जीवनात देखील त्या आपल्या काही आवडीनिवडी अवश्य जपतात. या अभिनेत्रींची अशीच एखादी आवड सांगायची झाली तर सामान्य महिलांप्रमाणे त्यांना असणारी झुमक्यांची आवड मुद्दाम सांगावी लागेल. बॉलिवूडच्या कैक अभिनेत्री एखाद्या खास कार्यक्रमासाठी झुमके घालणे पसंत करतात. बहुतांशी महिलांना कानातील झुमके आवडतात आणि प्रत्येक महिलेच्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये ते असतात. आता आपण झुमके घालायला आवडतात अशा बॉलिवूडमधील काही अभिनेत्री कोणत्या आहेत ते पाहूया.

विद्या बालन


भारतीय पेहराव, विशेषतः साडी विद्या बालनवर फारच शोभून दिसते. विद्या बालनची ज्वेलरी घालण्याचीही खास निवड असते. ती जेव्हा झुमके घालते तेव्हा तिचे झुमके देखील तिच्या कपड्यांप्रमाणे सुंदर असतात.

सोनम कपूर


स्टाइल दिवा सोनम कपूर बर्‍याच खास प्रसंगी झुमके घालते. तिचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ती वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल अशा दोन्ही आऊटफिटसोबत झुमके घालते आणि प्रत्येक आऊटफिटमध्ये ती सुंदर दिसते. सोनमची झुमके घालण्याची आवड तुम्हीही पाहा.

अनुष्का शर्मा


अनुष्का शर्मा साडी किंवा लेहंग्यासोबत झुमके घालते. अनुष्काने तिच्या लग्नात जे झुमके घातले होते, अगदी तसेच झुमके दीपिका पादुकोणने देखील घातले होते. एवढंच काय अनुष्काने लग्नात झुमके घातल्यानंतर अनेक मुलींनी त्यांच्या लग्नात अशा प्रकारचे झुमके घातले होते.

दीपिका पादुकोण


दीपिका पादुकोण एक अशी अभिनेत्री आहे जिला, रेखा, विद्या बालन यांसारख्या अभिनेत्रींप्रमाणे काही खास कार्यक्रमांसाठी साडी नेसायला आवडते आणि ती नेहमी साडीसोबत झुमके घालते. दीपिका पादुकोणचा हा देसी लूक अनेक महिला अनुसरतात. तुम्ही देखील दीपिका पादुकोणप्रमाणे पारंपरिक पेहरावासोबत झुमके घालू शकता.

करीना कपूर


बोल्ड-बिनधास बेबो म्हणजे करीना कपूरची प्रत्येक अदा विशेष असते. करीना कपूरने झुमके घातले की तिची कातिल अदा पाहणार्‍याला घायाळच करते. तिच्या चेहर्‍यावरून नजर हटत नाही.