ही बॉलिवूड जोडपी वयात मोठे अंतर असूनही आहेत खूप...

ही बॉलिवूड जोडपी वयात मोठे अंतर असूनही आहेत खूप आनंदी (Bollywood Couples Who Are Happily Married Inspite Of Huge Age Gap)

बॉलीवूडमध्ये अशी अनेक सुंदर जोडपी आहेत ज्यांनी आपल्या प्रेमासाठी वयाचे बंधन झुगारून दिलं असल्याचं दिसून येतं. या जोडप्यांमध्ये वयाचं मोठं अंतर असूनही ती एकमेकांसोबत खूप आनंदी आहेत आणि त्यांच्या चाहत्यांसाठी आदर्श आहेत.

सैफ अली खान आणि करीना कपूर खान

करीना कपूर पती सैफ अली खानपेक्षा १० वर्षांनी लहान आहे. ही दोघं २ मुलांचे पालक झाले आहेत आणि आपल्या छोट्याशा कुटुंबात खूप आनंदी आहेत. करीना सैफपेक्षा १० वर्षांनी लहान असली तरी ती अतिशय मॅच्युअर आहे. आपलं खाजगी आयुष्य आणि व्यावसायिक जीवन यातील समतोल राखणं तिला चांगलंच जमतं. जवळपास ५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सैफ आणि करिनानं लग्न केलं, सैफने दोहोंच्या वयातील अंतराला कधीच महत्त्व दिलं नाही. त्याची पहिली पत्नी अमृता सिंग, त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठी होती.

मीरा राजपूत आणि शाहिद कपूर

२०१५ मध्ये शाहिदने दिल्लीतील महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी लग्न केले. त्यावेळेस मीरा २१ वर्षांची होती तर शाहिद ३४ वर्षांचा होता. अलीकडेच या जोडप्याला मीशा ही गोड मुलगी झाली आहे. दोघांच्या वयात १३ वर्षांचे अंतर असूनही, दोघेही बॉलिवूडच्या क्यूट कपल्सपैकी एक आहेत. शाहिद स्टार असला तरी मीराचा इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही. असे असूनही हे जोडपे प्रत्येक जोडप्यासाठी प्रेरणास्थान आहे. दोघांमधील प्रेम सर्वांना प्रेरणा देणारे आहे. त्यांना बघून जणू काही त्यांच्यासाठी वय हा फक्त एक आकडा आहे, असे वाटावे.

प्रियंका चोपड़ा आणि निक जोनस

ग्लोबल आयकॉन बनलेली अभिनेत्री प्रियांका चोप्राने स्वतःहून १० वर्षांनी लहान असलेल्या निक जोनससोबत लव्ह मॅरेज केले होते, त्यामुळे तिला खूप ट्रोलिंगला बळी पडावे लागले होते, पण कालांतराने या दोघांमधील प्रेमाने ते सगळ्यांचे आवडते झाले आहेत. दोघांचे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, जे सर्वांच्याच पसंतीस उतरतात.

कतरीना कैफ आणि विक्की कौशल

नवविवाहित जोडपं कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी दोघांच्या वयामधील अंतराकडे दुर्लक्ष करून लग्न केले. कतरिना ३८ वर्षांची आहे तर विकी कौशल ३३ वर्षांचा आहे. दोघांच्या वयात ५ वर्षांचे अंतर असतानाही दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते आणि शेवटी प्रेम विवाहाच्या बंधनात अडकले.

नेहा कक्कड आणि रोहनप्रीत

संपूर्ण जगावर आवाजाची जादू करणारी गायिका नेहा कक्करने रोहनप्रीतचे हृदय जिंकले. नेहापेक्षा ७ वर्षांनी लहान असलेला रोहनप्रीत नेहाच्या प्रेमात इतका बुडला होता की नेहा त्याला नकार देऊ शकली नाही. नेहाला रोहनप्रीतमध्ये सुयोग्य जोडीदार दिसला अन्‌ अजिबात वेळ न घालवता आणि वयातील अंतराची पर्वा न करता दोघांनी लग्न करून स्वतःला सेटल केले. आज दोघेही त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी आहेत.

संजय दत्त आणि मान्यता दत्त

संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता यांच्या वयात १९ वर्षांचे अंतर आहे. या लग्नाने संजूचे कुटुंब आनंदी नव्हते. मात्र लग्नानंतर दोघंही सुखी जीवन जगत आहेत. दोघांनाही दोन मुले आहेत. संजय दत्त याआधी प्रेमाच्या बाबत कमनशीबी ठरला. मान्यताला भेटण्यापूर्वी त्याने दोनदा लग्न केले होते, पण दोन्ही लग्ने टिकली नाहीत. पण वयात मोठा फरक असूनही संजय-मान्यता यांचे लग्न टिकून आहे.

मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर

हे जोडपे त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनामुळे नेहमीच चर्चेत असते. अंकिता मिलिंदसोबत खूप खूश आहे आणि याची झलक सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळते. अंकिता मिलिंदपेक्षा २६ वर्षांनी लहान आहे. त्यांच्यातील सुंदर बाँडिंग पाहून त्यांच्या वयातील अंतराच्या प्रश्नावरच प्रश्नचिन्ह उभे राहते. या जोडप्याकडे बघून जणू प्रेमाला वयाची मर्यादा नसते याची खात्री पटते.