राजघराण्याशी संबंध असलेले बॉलिवूडचे कलाकार (Bol...

राजघराण्याशी संबंध असलेले बॉलिवूडचे कलाकार (Bollywood Celebrities Who Belong To Royal Families)

बॉलिवूडच्या मोहमयी वातावरणाचं आकर्षण लहानथोरांना आहे. गरीब आणि श्रीमंताला देखील. या मोहमयी नगरीत जो शिरला, तो तिथेच रुतला म्हणून समजा. त्यामुळेच घरची भरपूर श्रीमंत असलेले, राजघराण्याशी संबंध असणारे तरुण-तरुणी देखील या क्षेत्रात आले आहेत.

अदिती राव हैदरी

Bollywood Celebrities, Belong To Royal Families

दिसायला देखणी आणि वागण्यात सुरेख असलेल्या अदिती राव हैदरीला बघताच ती कोणत्या तरी राजघराण्याशी संबंधित असेल, असा भास होतो. तिचा दोन राजघराण्यांशी संबंध आहे. हैदराबादचे पहिले माजी मुख्यमंत्री आणि आसामचे माजी गव्हर्नर असलेले मोहम्मद सालेह अकबर हैदरी यांच्या पुतणीची पणती आहे. त्याप्रमाणे अदितीचे आजोबा जे. रामेश्वर राव हे वानापर्थीचे प्रशासन सांभाळत होते. २००७ साली अदिती चित्रसृष्टीत आली. अदिती भरतनाट्यम्‌ मध्ये देखील पारंगत आहे.

किरण राव

Bollywood Celebrities, Belong To Royal Families

आमीर खानची घटस्फोटीत दुसरी पत्नी किरण राव, हिचा देखील राजघराण्याशी संबंध आहे. किरण वानापर्थीचे राजा जे. रामेश्वर राव यांच्या परिवारातील आहे. तिचे आजोबा वानापर्थीचे राजे होते. (वानापर्थी म्हणजे कोलोनियल भारताचा एक भाग होता. जो आज तेलंगणातील मेहबूब नगर म्हणून ओळखला जातो) त्या अर्थाने किरण राव आणि अदिती राव हैदरी मामेबहिणी आहेत.

भाग्यश्री

Bollywood Celebrities, Belong To Royal Families

‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून, सलमान खानची नायिका म्हणून पदार्पण केलेली भाग्यश्री प्रत्यक्षात राजकुमारी आहे. तिचे वडिल विजय सिंहराव माधवराव पटवर्धन हे सांगली संस्थानच्या राजघराण्यातील आहेत. त्यांचे वाडवडील सांगली संस्थानचे राजे होते.

सागरिका घाटगे

Bollywood Celebrities, Belong To Royal Families

‘चक दे इंडिया’ मधून प्रीती सबरवालची भूमिका साकारलेली सागरिका घाटगे, ही प्रत्यक्षात राष्ट्रीय पातळीवर हॉकीपटू आहे. कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या कुटुंबियांशी ती संबंधित आहे. तिचे वडील कागलच्या राजघराण्यातील आहेत. तर तिची आजी ही इंदूरच्या तुकोजीराव होळकरांची कन्या आहे.

सैफ अली व सोहा अली खान

Bollywood Celebrities, Belong To Royal Families

बॉलिवूडचे छोटे नवाब म्हटला जाणारा सैफ अली व त्याची बहीण सोहा अली खान, हे पतौडी खानदानातील आहेत. त्यांच्या वागण्याबोलण्यातून राजेशाही घराण्याची झलक दिसून येते. पतौडी संस्थानामध्ये अखेरचे नवाब म्हणून त्यांचे पिताजी मन्सूर अली खान पतौडी यांची ओळख आहे. १९५२ ते १९७१ या कालखंडात ते नवाब म्हणून राहिले. त्यानंतर त्यांनी ही उपाधी सैफ अली खानला दिली. अशा रितीने सैफ हा पतौडीचा १० वा नवाब आहे.

मनीषा कोइराला

Bollywood Celebrities, Belong To Royal Families

मनीषा कोइराला हिचे संगोपन राजघराण्यातच झालेले आहे. तिचा जन्म व पालनपोषण नेपाळच्या राजघराण्यात झाले. मनीषाचे आजोबा आणि दोन काका नेपाळचे पंतप्रधान होते. तिचे वडील राजकीय नेते असून त्यांनी पर्यावरण मंत्री म्हणून काम केले आहे.

इरफान खान

Bollywood Celebrities, Belong To Royal Families

बॉलिवूडच्या या गुणी अभिनेत्याने गेल्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. तो राजघराण्याशी संबंधित होता. त्याचा जन्म जयपूरच्या टोंक या घराण्यात झाला. त्याचे पिताजी फार मोठे जमीनदार होते व राजघराण्याशी संबंधित होते. तर त्याची आई टोंक येथील हाकिम परिवारातील होती.

परवीन बाबी

Bollywood Celebrities, Belong To Royal Families

परवीन बाबी आज या जगात नाही. पण तिने कितीतरी सुपरहिट चित्रपटांची नायिका म्हणून अदाकारी गाजवली आहे. बिग बी सोबत तिची जोडी फारच चांगली जमली होती. परवीन ही जुनागढच्या बाबी वंशातील होती. ही मंडळी गुजरातच्या ऐतिहासिक पठाणी जमातीमधील आहेत.

सोनल चौहान

Bollywood Celebrities, Belong To Royal Families

मॉडेलिंग जगतात मोठं नाव कमावून सोनल चौहानने ‘जन्नत’ या चित्रपटातून कारकीर्द सुरू केली. सोनल ब्युटी क्वीन देखील होती. तिचा जन्म राजपूत घराण्यात झाला आहे. हे घराणे देशातील शरवीर व राजघराणे गणले जाणाऱ्या राजपूत वंशातील आहे.

रिया आणि रायमा सेन

Bollywood Celebrities, Belong To Royal Families

रिया आणि रायमा सेन या दोघी बहिणी प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन सेनच्या मुली आहेत. त्यांचे पिताजी त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित आहेत. त्यांची आजी कुचबिहारची राजकुमारी होती आणि जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांची मोठी बहीण होती.