शाहरुख खानपासून ते दीपिका पादुकोणपर्यंत हे बॉली...

शाहरुख खानपासून ते दीपिका पादुकोणपर्यंत हे बॉलीवूड स्टार्स विचित्र गोष्टींना घाबरतात (Bollywood Celebrities And Their Phobias)

बॉलिवूडमधील स्टार मंडळी सोशल मीडियावर अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या कपड्यांवरून तर कधी त्यांच्या वागण्या-बोलण्याने. पण आज आपण बॉलिवूड स्टार्सना असणाऱ्या विचित्र फोबियांबद्दल जाणून घेणार आहोत. हे स्टार्स विचित्र गोष्टींना घाबरतात. या यादीत शाहरुख खानपासून दीपिका पादुकोणपर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सच्या नावांचा समावेश आहे. एखाद्याला घोड्याची भीती वाटते तर कुणी झुरळ पाहून थरथर कापतो, अगदी टोमॅटो, सिलिंग फॅनचा फोबिया असणारे कलाकारही आहेत, हे जाणून तुम्ही नक्कीच चकित व्हाल.

बिपाशा बसू

बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बसू हिला अनेक हॉरर चित्रपटांमध्ये काम करताना तुम्ही पाहिलं असेल, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बिपाशा बसू स्वतःच्या हसण्याला घाबरते, इतकी भयानक ती हसते.

अजय देवगण

आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकणारा अभिनेता अजय देवगणचं नावही या यादीत सामील आहे. अजय देवगण स्वतःच्या हाताने जेवताना घाबरतो. याबाबत त्यांनी स्वतः खुलासा केला होता. खरोखर हे विचित्र आहे.

कतरिना कैफ

विकी कौशलची पत्नी आणि कतरिना कैफ अलीकडेच फोनभूत चित्रपटात दिसली होती. कतरिना कैफला टोमॅटोचा फोबिया आहे. ती तिच्या आसपासही टोमॅटो ठेवत नाही.

रणबीर कपूर

बॉलिवूड चित्रपटांचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला कोणत्या गोष्टीची भीती वाटते हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूर झुरळांना खूप घाबरतो.

आलिया भट्ट

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या खूप चर्चेत आहे. आलिया भट्ट अंधाराला घाबरते. ती रात्री घरातील पडदे थोडे उघडे ठेवून झोपते.

सोनम कपूर

या यादीत बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या नावाचाही समावेश आहे. सोनम कपूर लिफ्टऐवजी जिने चढणे पसंत करते. तिला लिफ्टचा फोबिया आहे.

अभिषेक बच्चन

फळे खायला सर्वांनाच आवडतात नव्हे ती खाल्लीच पाहिजेत असे आवर्जुन सांगितले जाते, पण अभिषेक बच्चनला फळांचा तिटकारा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने आयुष्यात कधीही कोणतेही फळ खाल्ले नाही.

शाहरुख खान

पठाण चित्रपटातील अभिनेता शाहरुख खानला बॉलिवूडचा किंग खान म्हटले जाते. पण शाहरुख खान घोडेस्वारीला खूप घाबरतो.

दीपिका पादुकोण

या यादीतील बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या भितीबाबत आपण समजू शकतो. ज्यांना पाहिल्यानंतर भल्याभल्या लोकांच्या तोंडचे पाणी पळते अशा सापांना दीपिका पादुकोण खूप घाबरते.

प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्राही शाहरुख खानप्रमाणे घोड्याला घाबरते. ती कधीही घोड्यासोबतचे शूट करत नाही.

विद्या बालन

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा प्राणी म्हणजे मांजर. पण विद्या बालन मांजरीला घाबरते.

अर्जुन कपूर

सध्या मलायकाचा बॉयफ्रेंड अशी एकमेव ओळख असणाऱ्या अर्जुन कपूरला कोणत्या गोष्टीची भिती वाटत असेल, याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. अर्जुनला सिलिंग फॅनची भिती वाटते. त्याच्या घरी तुम्हाला एकही फॅन दिसणार नाही, असं म्हणतात. अर्थात त्याला एसीचा पर्याय आहे, म्हणून बरंय.