बॉलिवूडचा शिल्पा शेट्टीवर बहिष्कार; शिल्पाने एक...

बॉलिवूडचा शिल्पा शेट्टीवर बहिष्कार; शिल्पाने एकटीनेच साजरी केली करवा चौथ (Bollywood Boycotts Shilpa Shetty: Not Invited For Parties, Actress Didn’t Get Karwa Celebration Invitation Too)

पोर्नोग्राफी व्हिडिओ प्रकरणात अटक झालेला राज कुंद्रा सध्या तुरुंगातून बाहेर आला आहे तसेच त्याची बायको शिल्पा शेट्टी देखील तिच्या शूटिंग्स्‌ आणि सोशल मीडियावर परत आली आहे. असं करून शिल्पा स्वतःला नॉर्मल दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तरी अजूनही ती सामान्य झालेली नाही. राज कुंद्रा प्रकरणानंतर परिचितांनी तिला पार्ट्यांमध्ये बोलावणे टाकलंय तसेच बॉलिवूडकरांच्या कोणत्याही कौटुंबिक समारंभासाठीही तिला बोलावले जात नाहीये. त्यामुळे बॉलिवूडने शिल्पा शेट्टीवर पूर्णपणे बहिष्कार टाकल्याचे बोलले जात आहे.

बॉलिवूड कुटुंबियांचा शिल्पावर बहिष्कार

राज कुंद्रा पोर्न केस संदर्भात अटकेनंतर शिल्पाला खूप मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. तिच्या करिअरवर देखील त्याचा परिणाम झाला. अनेक ब्रँडस्‌ आणि फिल्म निर्मात्यांनी शिल्पाला खड्यासारखे बाजूला केले. शिल्पानेही ट्रोलर्सपासून वाचण्यासाठी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. सध्या राज कुंद्रा जामिनावर जेलमधून बाहेर आला आहे आणि शिल्पानेही परीक्षक म्हणून टेलिव्हिजन शोचे शूटिंग सुरू केले आहे. परंतु बॉलिवूडने अजूनही शिल्पापासून दूर राहणेच पसंत केलेले दिसते. एके काळी प्रत्येक पार्टीतील शान असलेल्या शिल्पाला बॉलिवूड सेलेब्सनी त्यांच्या कौटुंबिक समारंभातही बोलावणे बंद केले आहे.

करवा चौथ सेलिब्रेशनचेही आमंत्रण आले नाही

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही २४ आक्टोबरला बॉलिवूडमध्ये मोठ्या धूमधामीत करवा चौथ साजरे केले गेले. दरवर्षी यात सहभागी असलेली शिल्पा शेट्टी मात्र यावर्षी यात सामील झाली नव्हती. कारण तिला या कार्यक्रमासाठी बोलावणेच आलेले नव्हते. असं म्हणतात की, शिल्पाने एकटीनेच करवा चौथ साजरी केली अन्‌ तिचे एकटीचेच फोटो शेअर केले आहेत. खरं तर यावर्षी अनिल कपूरच्या घरी करवा चौथ मोठ्या उत्साहात अन्‌ अनेक सेलेब्सच्या उपस्थितीत साजरी झाली. परंतु शिल्पा मात्र त्यात गैरहजर होती. शिल्पाला करवा चौथचं देखील आमंत्रण नव्हतं.

जुलै महिन्यात शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा याला पोर्न फिल्म बनवण्याच्या व त्या ॲप्सवर अपलोड करण्याच्या आरोपावरून क्राइम ब्रँचने अटक केली होती. त्यावेळेस ट्रोलर्सनी बॉलिवूडला देखील वेठीस धरले होते. त्यामुळे बॉलिवूडकर कोणतीही रिस्क नको असा विचार करून शिल्पापासून अंतर ठेवून आहेत.