अतिशय गबाळ्या वेशभूषेत फिरणाऱ्या अभिनेत्री (Bol...

अतिशय गबाळ्या वेशभूषेत फिरणाऱ्या अभिनेत्री (Bollywood actresses Who Really Need -Stylist)

हिंदी सिनेसृष्टीतील काही अभिनेत्री ह्या पडद्यावर जितक्या टकाटक आणि लई भारी वेशभूषेत
दिसतात, तितक्याच गबाळेपणाने त्या त्यांच्या रोजच्या जीवनात वावरताना दिसतात. त्यांना अशा अवतारात पाहणारी फॅन मंडळी, काय हे? असं म्हणून कपाळाला हात लावतात. तुम्हीही आपल्या आवडत्या या अभिनेत्रींना पाहून, काहीसं असंच बोलणार…

राणी मुखर्जी… दिसण्यात आणि अभिनयातही आपल्या फॅन्सच्या मनावर राज्य करणाऱ्या या
राणीचा अवतार कधी कधी पाहण्यासारखा असतो. कोणत्या कार्यक्रमासाठी कोणती वेशभूषा करावी याबद्दल तिला काही कळतं की नाही? असं तिच्याकडे पाहिल्यानंतर वाटतं. लग्न समारंभ आहे वा लग्नाच्या स्वागत समारंभासाठी जायचं तर काय घालून जायचं हे साधं कळत नाही तिला.
कित्येकदा तर तिचं ड्रेसिंग पाहून ती नाइट ड्रेसमध्ये आ्ल्यासारखी वाटते. तिच्या पसंतीच्या
साड्याही इतक्या भयानक असतात की तिला पाहणारे एकतर तिला स्वतःचा स्टाइलिस्ट
बदलायला सांगतात किंवा मग तू स्वतःला बदल असा कळकळीचा सल्ला देतात.

साडीवर भरभरून प्रेम असणारी विद्या बालनची तऱ्हाही काहीशी राणीसारखीच म्हणायला हवी.
साडीतील तिच्या गबाळ्या लुकची काय तारीफ करायची? आणि वेस्टर्न ड्रेस विद्याबाईंना
अजिबातच सूट करत नाहीत, तिने त्याच्या वाटेलाही जाऊ नये खरं तर. बाकी तिचं काम आणि
अभिनय उत्तम आहे, यात शंकाच नाही.

मल्लिका शेरावत भले कितीही सेक्सी आणि बोल्ड आहे पण, तिला तिच्या वेशभूषेकडे लक्ष
देण्याची नितांत गरज आहे. कान्स महोत्सवामध्ये देखील तिच्या वेशभूषेमुळे अनेकदा ती
हास्यास्पद ठरली आहे. स्टाइलपेक्षाही अंग प्रदर्शनाच्या बाबतीत ती जरा जास्तच आग्रही असताना
दिसते.

कधी विवादात्मक संवाद तर कधी मजेशीर वेशभूषा अशा काही ना काही कारणांनी नेहा धुपिया
बरेचदा ट्रोल होत असते. काहीतरी वेडंवाकडं करायचं आणि प्रसिद्धी पावायचं असा काहीसा
नेहाचा बाणा दिसतो.

सोनाक्षी सिन्हाला चित्रपटांमध्ये अव्वल नंबर मिळाला नाहीच शिवाय फॅशन जगतातही तिच्या
वेशभूषेमुळे ती सतत चर्चेचा विषय बनली आहे. कोणत्याही समारंभामध्ये ती कधीही नॉर्मल
वाटतच नाही, असं वाटतं की सगळ्यांमध्ये उठून दिसावं यासाठी काही करण्याच्या नादात ती
कधी डिस्को बॉल बनून येते तर, कधी विदूषकाप्रमाणे कपडे घालते. तिचे फॅन्स तिला फॅशन
सेन्स सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला देतात.