आपल्यापेक्षा कमी वयाच्या पुरुषांच्या प्रेमात पड...

आपल्यापेक्षा कमी वयाच्या पुरुषांच्या प्रेमात पडलेल्या या अभिनेत्री, काहींनी लग्नही केलंय! (Bollywood Actresses Who Married Or Dated Younger Men)

प्रियंका चोप्रा : प्रियंका आपल्यापेक्षा दहा वर्षांनी लहान निक जोन्सच्या प्रेमात पडली त्यावेळेस त्यांचं प्रेमप्रकरण बरंच गाजलं. हे केवळ पासिंग अफेअर आहे, असं सगळ्यांना वाटत होतं. परंतु, दोघांनी आपापल्या रितीरिवाजाप्रमाणं अगदी पद्धतीशीर लग्न केलं.

सुष्मिता सेन : सध्या सुष्मिताचं रोहमनसोबत प्रेमप्रकरण सुरू आहे आणि या दोहोंमध्ये १५ वर्षांचं अंतर आहे. तरीही वयातील अंतरामुळे त्यांच्या नात्यात मात्र अंतर आलेलं नाही.

नेहा धूपिया : नेहानं अचानक अंगद बेदी सोबत लग्न करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. पण नंतर कळलं की ती गरोदर होती. नेहा ही अंगदपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. या दोहोंमध्ये सुरुवातीला अतिशय चांगली मैत्री होती आणि नंतर मैत्रीचं नातं विवाहात बदललं.

सोहा अली ख़ान : कुणाल खेमु हा सोहापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. दोघांचं लग्न झालं असून त्यांना एक छान मुलगी आहे.

ऐश्वर्या राय बच्चन : मिस वर्ल्ड सौंदर्यवती ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चनपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे आणि दोघांनी लग्न केलं असून त्यांना आराध्या ही मुलगी आहे.

झरीना वहाब : आदित्य पंचोली झरीनापेक्षा सहा वर्षांनी लहान आहे. एका चित्रपटाच्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली आणि आपण दोघं एकमेकांसाठीच बनलो आहोत अशी त्यांना अनुभूती झाली. या अनुभूतीचं रुपांतर पुढे लग्नात झालं.

टीना अंबानी : अंबानी परिवारातील ही सून एकेकाळी हॉट अभिनेत्री होती. त्यावेळेस सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबतही टीनाचं नाव जोडलं गेलं होतं, परंतु त्या दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. कारण टीनाचं नशीब अनिल अंबानीशी जोडलेलं होतं. अनिल अंबानी आणि टीना यांमध्ये तीन वर्षांचं अंतर आहे. टीना अनिलपेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. दोघं एका पार्टीमध्ये भेटले आणि त्यांनी आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला.

नम्रता शिरोडकर : महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर हे एका सिनेमाच्या सेटवर भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. चार वर्षं ही दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यांनतर २००५ साली महेश आणि नम्रताने लग्न केलं. नम्रता मेहश बाबूपेक्षा चार वर्षांनी मोठी आहे.

बिपाशा बसु : करण सिंह ग्रोवर हा बिपाशापेक्षा चार वर्षांनी लहान आहे. आपल्या रंगील्या स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला करण एका सिनेमाच्या सेटवर बिपाशाला पाहून तिच्यावर लट्टू झाला आणि तेथेच त्यांच्या लग्नाची गाठ सेट झाली. त्यानंतर करणने जेनिफरला घटस्फोट देऊन बिपाशाशी लग्न केलं.

उर्मिला मातोंडकर : रंगीला गर्ल उर्मिलानं एका काश्मिरी तरुणास आपलं हृदय दिलं. मोहसिन उर्मिलापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे. तरीही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्न केलं. मोहसिन आधी मॉडल होता आणि आता तो यशस्वी बिजनेसमन आहे.

मलाइका अरोरा : अरबाज खानला रीतसर घटस्फोट दिल्यानंतर मलाइका आपल्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरच्या प्रेमात पडली आहे. दोहोंमधील प्रेमप्रकरण बरंच चर्चिलं जात आहे.

फराह खान : आपल्यापेक्षा आठ वर्षांनी लहान शिरीष कुंदरला फराह ‘मैं हूं ना’ या चित्रपटाच्या सेटवर भेटली, त्याच्या प्रेमात पडली आणि दोघांनी लग्नही केलं.

अमृता सिंह : वयानेही छोटा असलेला छोटा नवाब सैफ अली खान त्यावेळेस अमृता सिंगच्या प्रेमात पडला होता. दोघांमध्ये १२ वर्षांचं अंतर होतं शिवाय घरातून त्यांच्या लग्नाला विरोध होता. असं असतानाही दोघांनी लग्न केलं. त्यांना दोन मुलं झाली आणि आता ते स्वतंत्रही झाले आहेत.

अर्चना पूरन सिंह : अर्चना ही परमीत सेठीपेक्षा सात वर्षांनी मोठी आहे परंतु दोघांची जोडी अनुरुप वाटते. अर्चना आणि परमीत पहिल्यांदा एका मित्राच्या घरी भेटले आणि पाहता क्षणी प्रेमात पडले. परमीतच्या घरून त्यांच्या लग्नाला विरोध होता. तरीही चार वर्षं लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न केले.

नरगिस दत्त : नरगिस सुनिल दत्त यांच्यापेक्षा एक वर्षांनी मोठ्या होत्या. राज कपूर यांच्यासोबतचं नातं बिघडल्यानंतर सुनिल दत्त यांनी नरगिससोबत लग्न केलं. नरगिस त्यावेळेस खूपच यशस्वी अभिनेत्री होत्या. परंतु सुनिलच्या रुपाने त्यांना खरा जोडीदार मिळाला.

मेहर जेसिया : अर्जुन रामपालपेक्षा दोन वर्षांनी ती मोठी होती. आता दोघं स्वतंत्र झाले आहेत परंतु, एकेकाळी दोघांनी एकमेकांवर जिवापाड प्रेम केलं होतं.

शिल्पा शेट्टी : शिल्पा आपले पती राज क़ुंद्रापेक्षा फक्त तीन महिन्यांनी मोठी आहे. शिल्पाशी लग्न करण्यापूर्वी राज विवाहित होता. परंतु शिल्पाच्या प्रेमात पडल्यानंतर त्याने आपल्या पहिल्या बायकोस घटस्फोट देऊन शिल्पासोबत विवाह केला. त्यांना दोन मुलंही आहेत.