मंगळसूत्र : बॉलिवूड अभिनेत्रींचा आवडता दागिना (...

मंगळसूत्र : बॉलिवूड अभिनेत्रींचा आवडता दागिना (Bollywood Actresses who flaunted Intricate Yet Trendy Mangalsutra after their Wedding)

अभिनेत्रींच्या लग्नामध्ये त्यांच्या ब्रायडल आउटफिट आणि सौंदर्याची चर्चा होते तेवढीच त्यांच्या मंगळसूत्राचीही चर्चा होते. लग्नानंतर बऱ्याच बॉलिवूड अभिनेत्री आपल्या मंगळसूत्रामुळे चर्चिल्या गेल्या आहेत तर काहींची मंगळसूत्र घालण्याची तऱ्हा वेगळी होती म्हणून त्या ट्रोल झाल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी जैद दरबारची नववधू गौहर खानच्या मंगळसूत्राची खूप चर्चा झाली. गौहर खान इंडियन आउटफिट मध्ये असो वा वेस्टर्न लूकमध्ये तिच्या गळ्यातील मंगळसूत्र नेहमीच पाहणाऱ्याचं लक्ष वेधून घेतं. गौहरच्या मंगळसूत्रामध्ये काळे मणी आणि सोन्याची चेन व स्क्वायर शेपचा डायमंड आहे.

सोनम कपूर देखील आपल्या मंगळसूत्रामुळे चर्चिली गेली होती. तिच्या मंगळसूत्राची विशेष बाब म्हणजे सोनमने स्वतःच ते डिझाइन केलं होतं. सोनमने मंगळसूत्रामध्ये तिचं आणि पती आनंद आहुजा यांचं झोडॅक साईन बनवलं होतं. मंगळसूत्राच्या मधे सॉलिटेयर लावलं होतं. हे मंगळसूत्र गळ्यातून काढून हातात घातल्यानंतर सोनम कपूर मीडियामध्ये भलतीच ट्रोल झाली होती.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा आपली स्टाइल आणि फॅशनमुळे कायम चर्चेत असते. शिल्पाचं लग्न अतिशय धुमधडाक्यात झालं. इतर अभिनेत्रींप्रमाणे शिल्पाच्या मंगळसूत्रानेही चर्चेला विषय मिळाला होता. शिल्पाने चोकर स्टाईलमध्ये आपलं मंगळसूत्र बनवून घेतलं होतं. काळ्या मण्यांच्या छोट्याशा चेनमध्ये हिऱ्याचं चोकर पद्धतीचं मंगळसूत्र तिच्या स्टायलिश आणि पारंपरिक लूकला अधिक खूलवत होतं. तिच्या या मंगळसूत्राची किंमत जवळजवळ ३० लाख रुपये इतकी सांगितली जाते. दरवर्षी करवाचौथला शिल्पा हे मंगळसूत्र घालते. या व्यतिरिक्त शिल्पाने आपल्या हातात घालण्यासाठी अगदी मंगळसूत्रासारखं ब्रेसलेट बनवलं होतं. अनेकदा तिच्या हातात ते पाहिलंही गेलं आहे.

प्रियंका चोप्राने जरी विलायती नवरा केला असला तरी मंगळसूत्राचं महत्त्व ती जाणते. काळ्या मण्यांच्या मध्ये हिरा असलेलं तिचं मंगळसूत्र किती किमतीचं आहे माहीत नाही, परंतु तिच्यासाठी ते अनमोल आहे. एका विदेशी मॅगझीनच्या एका पत्रकाराने प्रियंकाला प्रश्न विचारला की तुझ्यासाठी सगळ्यात जास्त मौल्यवान काय आहे, त्यावर प्रियंकाने तिला तिचं मंगळसूत्र सर्वाधिक मौल्यवान असल्याचं म्हटलं होतं. मंगळसूत्राबद्दल बोलताना प्रियंका म्हणते, ‘भारतीय विवाह पद्धतीमध्ये हा असा एक दागिना आहे, जो लग्नाच्या वेळेस नवरा आपल्या बायकोच्या गळ्यात घालतो.’ प्रियंका वेस्टर्न आउटफिटमधेही गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसते. तिने मंगळसूत्रासारखं ब्रेसलेटही बनवलं आहे, ते देखील ती नेहमी वापरते.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लग्नानंतर जेव्हा प्रथम विमानतळावर दिसले तेव्हा त्यांच्या पारंपरिक पोषाखासोबतच अनुष्काच्या मंगळसूत्राचीही वाहवा झाली होती. फुलांचं सुंदर डिझाइन असलेलं हिऱ्यांनी भरलेलं अनुष्काचं मंगळसूत्र ५२ लाखाचं होतं. विराट आणि अनुष्काचं लग्न २०१७ मध्ये झालं.

दीपिका पाही खूप लोकप्रिय झालं. काळ्या मण्यांमधे एक मोठा डायमंड असलेलं मंगळसूत्राचं डिझाइन लोकांना अतिशय आवडलं. लग्नानंतर अनेक समारंभामध्ये दीपिका मंगळसूत्र घालून आलेली पाहण्यात आले आहे.

मागील वर्षी गौतम कीचलू यासोबत विवाह बंधनात अडकलेली अभिनेत्री काजल अग्रवालचे मंगळसूत्र दीपिकाच्या मंगळसूत्रापेक्षा लहान आहे परंतु त्याचं डिझाइन मात्र सारखंच दिसत आहे. मंगळसूत्रामधील डायमंड सारखाच आहे.

मंगळसूत्राचा विषय आणि बॉलिवूडची ब्यूटी क्वीन ऐश्वर्या रायच्या मंगळसूत्राची चर्चा नाही करायची, असं होऊ शकत नाही. ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लग्न २००७ साली झालं. त्यावेळेस ऐश्वर्याच्या दाक्षिणात्य पद्धतीच्या साडीचे देखील खूप कौतुक झाले. त्यानंतर तिचं मंगळसूत्र देखील चर्चिलं गेलं. लग्नात ऐश्वर्याने ७५ लाखाची साडी नेसली होती आणि तिचं मंगळसूत्र ४५ लाखाचं होतं, असं सांगण्यात आलं होतं.

लग्न म्हटलं की मंगळसूत्र आणि कुंकू आलंच. ही सौभाग्याची देणी आहेत. बॉलिवूडमधील अभिनेत्री भले लग्नानंतर रोज मंगळसूत्र घालत नसतील परंतु, तरीही त्यांना त्याचं महत्त्व माहीत आहे. म्हणूनच संधी मिळताच त्या आपल्या मंगळसूत्रास आपल्या स्टाईलमध्ये सहभागी केल्याशिवाय राहत नाहीत. आणि दर्शकही त्यांच्या वेडिंग आउटफिट इतकीच त्यांच्या मंगळसूत्राचीही तारीफ केल्याशिवाय राहत नाहीत.