फिट राहण्यासाठी व्यायामाऐवजी योगासने करणाऱ्या अ...

फिट राहण्यासाठी व्यायामाऐवजी योगासने करणाऱ्या अभिनेत्री (Bollywood Actresses Who Chose Yoga Over Gym)

शिल्पा शेट्टी : शिल्पाच्या सेक्सी फिगरवर किती जण फिदा झाले असतील कुणास ठाऊक. तिच्यासारखी पतली कमर आणि हॉट फिगर असावी, असं प्रत्येक तरुणीला वाटतं. मात्र शिल्पाला हा फिटनेस योगासनांमुळे मिळाला आहे. शिल्पाला योगाभ्यासाचं वेड आहे. अन्‌ योगा करत असल्याचे व्हिडिओ ती बरेचदा शेअर करत असते. तिनं योगासनांची डीव्हीडी पण प्रकाशित केलेली आहे. जेणेकरून फिट राहण्यासाठी योग करणे आवश्यक असल्याची प्रेरणा लोकांना मिळेल. बाबा रामदेव यांच्या योगाभ्यास सत्रात शिल्पा गेली होती.

बिपाशा बसु : शिल्पा प्रमाणेच बिपाशाने देखील योगाची डीव्हीडी प्रसिद्ध केलेली आहे. तिच्या फिटनेसचे व तरण्या देहाचे रहस्य योगाभ्यासात आहे. आपला नवरा करण सिंह ग्रोवर सोबत देखील ती योग करत असते.

करीना कपूर : करीना फिटनेसबाबत किती जागरूक आहे, हे सगळेच जाणतात. तिने तर झिरो साइजचा ट्रेंड सुरू केला होता. तिची सेक्सी फिगर आणि सतेज कांती योगामुळेच साध्य झाली आहे. करीनाला फिटनेस राखण्यासाठी व्यायामशाळेत जायला अजिबात आवडत नाही. पण त्यासाठी तिने योगाभ्यास सुरू केला आणि आता ती आपले कुटुंबिय व मैत्रिणींना देखील योगाभ्यास करण्याची प्रेरणा देत असते.

सुश्मिता सेन : वयाच्या ४४ वर्षी देखील सुश्मिता अतिशय हॉट आणि फिट दिसते. कारण ती योगप्रेमी आहे. आपल्यापेक्षा १५ वर्षे लहान असलेल्या रोहमनशी ती डेट करते आहे. त्याच्यासोबत ती बरेचदा योग करताना दिसते. त्याचे व्हिडिओ नि फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.

जॅकलीन फर्नांडिस : ही नियमितपणे योग करते. दिवसेंदिवस ती अधिकच फिट होताना दिसते आहे. योगाभ्यास हेच त्याचं कारण आहे. योग करतानाचे आपले फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करते. फिटनेसच्या बाबतीत ती ऑनलाईन इव्हेंट घेते. अन्‌ फिट राहण्याची लोकांना प्रेरणा देते.

मलायका अरोरा : सुरुवातीला मलायका जिममध्ये जात होती. पण करीना कपूरने तिला योग करण्याचे फायदे सांगितले. अन्‌ तिने योगाभ्यासावर भर दिला. ती योग इव्हेंटस्‌ आणि हेल्थ ॲन्ड वेलनेस साईट बरोबर भागीदारी करते आहे. योगाचे शारीरिक तसेच मानसिक फायदे काय आहेत, याची माहिती ती लोकांना देत असते.