सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्रींचा खटाटोप (Bollywoo...

सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्रींचा खटाटोप (Bollywood Actresses Do All These Things To Look Beautiful)

बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगात आपलं सौंदर्य टिकवण्याचा लहानमोठया अभिनेत्री बऱ्याच प्रयत्नशील असतात. चेहऱ्याचं आणि शरीराचं सौंदर्य टिकवलं, तरच आपण या दुनियेत टिकून राहू याची त्यांना पूर्ण कल्पना असते. त्यामुळेच त्या सदैव सुंदर दिसण्यासाठी काय काय खटाटोप करतात ते पाहूया.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
व्यायाम :
हे मेहनतीचं काम आहे खरं, पण स्वतःच सौंदर्य आणि फिटनेस टिकवण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे नट- नट्या कित्येक तास जिममध्ये जाऊन घाम गळतात. योगभ्यास करतात व प्राणायाम देखील करतात अन स्वतःला शरीर व मानाने फिट ठेवू शकतात. व्यायाम प्रकाराने शरीरातील घाण, घामाद्वारे निघून जाते. अन प्राणायाम केल्यावर मन शांत आणि कार्यरत राहते. आतून आणि बाहेरून ते अशा रीतीने सुंदर दिसतात.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

उकडलेल्या भाज्या :
आपण तब्येत बिघडल्यावर डॉक्टरांकडे जातो तेव्हा, ते आपल्याला खाण्यापिण्याकडे लक्ष देण्याचा सल्ला देतात. बॉलिवूडच्या आपल्या अभिनेत्री उकडलेल्या भाज्या खाण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे चरबी वाढत नाही, अन त्वचा देखील सतेज राहते.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

मासळीला पसंती :
बॉलिवूडच्या ज्या अभिनेत्री मांसाहारी आहेत, त्यांचा जास्त करून मासळी खाण्याकडे कल असतो कारण लाल मांस हानिकारक असते. त्यामुळे चिकन – मटण यांच्या पासून त्या दूरच राहतात. सी फूड देखील त्या ग्रिल्ड करून खातात. त्याला मसाले लावणे टाळतात. त्यामुळे त्यांची त्वचा तजेलदार राहते.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

गरम पाणी पितात :
दररोज जास्तीत जास्त पाणी पिणे हितकारक असते. त्यात पुन्हा गरम पाणी पिणे जास्त लाभदायक. आपल्या अभिनेत्री नेमकं हेच करतात. त्याच्याने शरीरातील विषद्रव्ये कमी होतात. पचनशक्ती सुधारते आणि चरबी देखील घडविते.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

घरगुती पॅक :
सुंदर दिसण्यासाठी बाजारातील महागडी प्रॉडक्ट्स वापरली पाहिजेत, असं अजिबात नाही. हे जाणून आपल्या अभिनेत्री घरगुती पॅक वापरतात. म्हणजे त्या महागडी सौंदर्यप्रसाधने वापरतात, पण त्यापेक्षा घरगुती पॅक्सना जास्त महत्व देतात. काही जणी तर स्वतःच असे पॅक बनवतात नि वापरतात.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
तुम्हालासुद्धा असंच फिट राहून फिगर आणि सौंदर्य राखायचं असेल तर अभिनेत्रीं सारखे नियम स्वतःला घालून घ्या, आणि आनंद मिळावा.