अभिनेत्री वाणी कपूर हिच्या हस्ते जीप मेरिडियन, ...

अभिनेत्री वाणी कपूर हिच्या हस्ते जीप मेरिडियन, या नव्या कारचे अनावरण (Bollywood Actress Vaani Kapoor Unveils The New Jeep Meridian Car)

ग्लॅमरस्‌ अभिनेत्री वाणी कपूर हिच्या हस्ते जीप मेरिडियन या नव्या कारचे अनावरण नुकतेच करण्यात आले. या प्रसंगी ग्रुप लॅन्डमार्कचे चेअरमन व संस्थापक संजय ठक्कर देखील उपस्थित होते. कारच्या एसयूव्ही सेगमेंटचा आणखी विस्तार करण्यासाठी ही नवी डिझाइन तयार करण्यात आली आहे. विशेष प्रारंभिक किंमतीत ही आरामदायी कार २९.९ लाख रुपयांत मिळणार असून याचे अधिकृत बुकींग सुरू होण्यापूर्वी ६७ हजार पेक्षा अधिक ग्राहकांनी चौकशी केली आहे. तर ५ हजार पेक्षा जास्त ग्राहकांनी नोंदणी करण्यात रस दाखवला आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त, जागतिक दर्जाच्या अनेक सुविधा या आलिशान कारमध्ये असून सर्वाधिक वेग आणि सर्वोत्तम पॉवर –टू- वेट या वैशिष्ट्यांनी ती ओळखली जाते.

या प्रसंगी जीप ब्रॅन्ड इंडियाचे प्रमुख निपुण जे. महाजन म्हणाले, “शक्तीशाली, अत्याधुनिक, आरामदायी एसयूव्हीच्या शोधात असणाऱ्या ग्राहकांसाठी उत्तम पर्याय देण्यासाठी या कारची किंमत अगदी किफायतशीर ठेवली आहे. जीप मेरिडियन साहस आणि अत्याधुनिकतेचे अनोखे मिश्रण आहे.”

ही जीप मेरिडियन लिमिटेड आणि लिमिटेड (ओ) अशा दोन प्रकारात उपलब्ध आहे. या दोन्ही ४x२ फ्रंट व्हील ड्राइव्हसह, उपलब्ध असून ६ स्वीड मॅन्युअल तर ९ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचाही पर्याय आहे.