आलिया भट्टने पहिल्यांदाच केलं मॅटर्निटी फोटोशूट...

आलिया भट्टने पहिल्यांदाच केलं मॅटर्निटी फोटोशूट (Bollywood Actress Alia Bhatt Maternity Photoshoot)

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. नुकताच आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही पार पडला. अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावली.

अनेकदा आलिया बेबी बंप फ्लॉन्ट करतानाही दिसून आली. तिचे बेबी बंप दाखवतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते.

आता पहिल्यांदाच आलियाने तिच्या स्वतःच्या ‘Eda Mama’ या नव्या कोऱ्या मॅटर्निटी क्लोथ ब्रॅण्डसाठी फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

फोटोमध्ये प्रेग्नन्सी दरम्यान आलियाच्या चेहऱ्यावर आलेला ग्लो स्पष्ट दिसत आहे. स्वेटशर्टमध्ये, केशरी रंगाच्या ड्रेसमध्ये, डोक्यावर हॅट घालून, डेनिमच्या जम्पसूटमधील… अशा सगळ्याच परिधानांतील आलियाचा लूक खास आहे.

बेबी बंप फ्लॉन्ट करत तिने फोटोसाठी पाऊटही केलं आहे.

फोटोशूटमधील काळ्या रंगाच्या ड्रेसमधील आलियाचा लूक लक्षवेधी ठरत आहे.

आलिया-रणबीरच्या बाळासाठी चाहते आतुर असून तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

(सर्व फोटो : आलिया भट्ट/ इन्स्टाग्राम)